Gautami Patil: "माझा कारभार सोपा नसतोय रं" नंतर आता "दिलाचं पाखरू "; गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची होतीये चर्चा!
Gautami Patil : "दिलाचं पाखरू" या गाण्यात गौतमीचा रोमँटिक अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळत आहे.
![Gautami Patil: Gautami Patil new song Dilacha Pakhru viral on social media Gautami Patil:](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/21/415835c3f978459f6f46812f606c02831697865513895259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gautami Patil : गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या नृत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकते. गौतमीच्या अदा आणि तिचा डान्स हा प्रेक्षकांना घायाळ करतो. सध्या गौतमी ही तिच्या एका नव्या गाण्यामुळे चर्चेत आहे. गौतमीचं "दिलाचं पाखरू" हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. "दिलाचं पाखरू" या गाण्यात गौतमीचा रोमँटिक अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळत आहे.
गौतमी पाटीलचं "दिलाचं पाखरू" हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलं. हे गाणं धुरंधर, निधी हेगडे, स्वराज थिटे यांनी गायले आहे. या गाण्याचा गीतकार धुरंधर हा आहे. तर त्यानेच या गाण्याची संगीत रचना केली आहे.
"अय मन माझा डुलतंय गं, तुलाच बघुनी फुलतंय गं
अय दिलाच्या मळ्यामंदी, प्रेमाचं पाखरू भुललय गं
अय तुझ्यामागं पळतंय गं, अय तुझ्यासाठी झुरतंय गं
अय दिलाच्या मळ्यामंदी, प्रेमाचा पाखरू भुललय गं" असे या गाण्याचे बोल आहेत.
"दिलाचं पाखरू" या गाण्यात गौतमी ही घोडेस्वारी देखील करताना दिसत आहे. "दिलाचं पाखरू" या गाण्याचा व्हिडीओ गौतमीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच धुरंधर या युट्यूब चॅनलवर "दिलाचं पाखरू" हे संपूर्ण गाणं शेअर करण्यात आलं आहे. या गाण्याला आतापर्यंत 66,761 व्ह्यूज मिळाले असून 5.6K एवढे लाइक्स या गाण्याला मिळाले आहे.
View this post on Instagram
गाण्याला मिळाली नेटकऱ्यांची पसंती
"खूपच छान गाणं आहे" अशी कमेंट करुन एका नेटकऱ्यानं गौतमीच्या या गाण्याचं कौतुक केलं आहे. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "सबसे कातील गौतमी पाटील"
गौतमी पाटीलचा घुंगरु हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गौतमीच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'घुंगरू' या सिनेमात गौतमी पाटीलसोबत बाबा गायकवाड देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. लोककलावंतांच्या आयुष्यावर भाष्य करणारं या चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटाच्या बाबा गायकवाडने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)