Gautami Patil Movie : नाद करा पण गौतमीचा कुठं... सबसे कातीलच्या पहिल्या वहिल्या 'घुंगरू'चा टीझर आऊट; 'लावणी क्वीन'चं अभिनय क्षेत्रात पदार्पण
Ghungroo : गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) आगामी 'घुंगरू' या सिनेमाचा उत्कंठावर्धक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Gautami Patil Ghungroo Teaser Out : 'लावणी क्वीन' गौतमी पाटील (Gautami Patil) आता मोठा पडदा गाजवायला सज्ज आहे. तिच्या पहिल्या-वहिल्या 'घुंगरू' (Ghungroo) या सिनेमाचा उत्कंठावर्धक टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आहे. टीझरने चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढवली असून ते आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
'घुंगरू'च्या टीझरमध्ये काय आहे?
'घुंगरू' या सिनेमाच्या टीझरमध्ये अॅक्शन, डान्स, थरार आणि नाट्य पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर 'घुंगरू'चा टीझर चांगलाच व्हायरल होत आहेत. 'लावणी क्वीन'च्या अभिनयाची जादू या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या टीझरला साऊथ टच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महाराष्ट्राची लाडकी सबसे कातील गौतमी पाटील प्रथमच रुपेरी पडद्यावर असं म्हणत हा टीझर आऊट करण्यात आला आहे.
View this post on Instagram
गौतमीने सोशल मीडियावर या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत तिने लिहिलं आहे,"माझ्या घुंगरू' सिनेमाचा टीझर". या टीझरवर चाहते कमेंट्स करत गौतमीचं अभिनंदन करत आहेत. गौतमी म्हटल्यावर सिनेमा पण सुपरहिट होणार, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात हा सिनेमा गाजणार, नाद करा पण गौतमीचा कुठं, सबसे कातील गौतमी पाटील अशा कमेंट्स चाहते करत आहेत.
लावणी कलावंताच्या भूमिकेत दिसणार गौतमी पाटील!
'घुंगरू' या सिनेमात गौतमी पाटील एका लावणी कलावंताच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुष्यात येणाऱ्या अघटिक घटनांमुळे ती नायकाच्या प्रेमात पडते. यात राजकारण, थरार-नाट्यदेखील पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अनेक नवोदित कलाकारांसह अभिनेत्री उषा चव्हाणदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
गौतमीच्या 'घुंगरू' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. अश्लील नृत्यामुळे चर्चेत आलेली गौतमी आता सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचं शूटिंग सोलापूर, हंपीसह परदेशातदेखील झालं आहे. या सिनेमात गौतमी बाबा गायकवाडसोबत (Baba Gaikwad) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. लोककलावंतांच्या आयुष्यावर भाष्य करणारं या सिनेमाचं कथानक असून बाबा गायकवाडने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
संबंधित बातम्या