Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत; मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
Sahkutumb Sahparivar : 'सहकुटुंब सहपरिवार' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
Sahkutumb Sahparivar : 'सहकुटुंब सहपरिवार' (Sahkutumb Sahparivar) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण हळूहळू मालिकेचं कथानक लांबवलं गेलं आणि प्रेक्षक नाराज झाले. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
Bollywood Actors Debut Film Fees : अमिताभ बच्चन ते शाहरुख खान; तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींची पहिली कमाई किती? जाणून घ्या...
Bollywood Actors Debut Film Fees : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ते शाहरुख खानपर्यंत (Shah Rukh Khan) अनेक कलाकार आज सेलिब्रिटी असले तरी हा पल्ला गाठण्यासाठी त्यांना खूप स्ट्रगल करावा लागला आहे. अनेक अडचणींचा सामना करत ते आज यशस्वी झाले आहेत. यात बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय कलाकारांचा समावेश आहे.
Bollywood Actors Debut Film Fees : अमिताभ बच्चन ते शाहरुख खान; तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींची पहिली कमाई किती? जाणून घ्या...
Surinder Shinda Passes Away: पंजाबी गायक सुरिंदर शिंदा यांचे निधन; वयाच्या 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Surinder Shinda Passes Away: प्रसिद्ध गायक सुरिंदर शिंदा (Surinder Shinda) यांचे निधन झाले आहे. सुरिंदर शिंदा यांनी बुधवारी पहाटे लुधियानाच्या DMCH रुग्णालयात वयाच्या 64 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुरिंदर हे गेले काही दिवस आजारी होते. सुरिंदर यांच्या निधनामुळे पंजाबी संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक जण सुरिंदर शिंदा यांना श्रद्धांजली वाहात आहेत.
ਉੱਘੇ ਗਾਇਕ ਸੁਰਿੰਦਰ ਸ਼ਿੰਦਾ ਜੀ ਦੀ ਮੌਤ ਦੀ ਖ਼ਬਰ ਸੁਣਕੇ ਬਹੁਤ ਦੁੱਖ ਹੋਇਆ...ਪੰਜਾਬ ਦੀ ਬੁਲੰਦ ਆਵਾਜ਼ ਅੱਜ ਸਦਾ ਲਈ ਖ਼ਾਮੋਸ਼ ਹੋ ਗਈ...
— Bhagwant Mann (@BhagwantMann) July 26, 2023
ਸ਼ਿੰਦਾ ਜੀ ਭਾਵੇਂ ਸਰੀਰਕ ਤੌਰ 'ਤੇ ਨਹੀਂ ਰਹੇ ਪਰ ਉਹਨਾਂ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਸਦਾ ਗੂੰਜਦੀ ਰਹੇਗੀ... ਵਿਛੜੀ ਰੂਹ ਨੂੰ ਵਾਹਿਗੁਰੂ ਆਪਣੇ ਚਰਨਾਂ 'ਚ ਨਿਵਾਸ ਦੇਣ ਤੇ ਪਰਿਵਾਰ ਨੂੰ ਭਾਣਾ ਮੰਨਣ ਦਾ ਬਲ ਬਖ਼ਸ਼ਣ...… pic.twitter.com/d2va6dbvK3
Samantha Ruth Prabhu : अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतल्यानंतर समंथा काय करतेय? अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा
Samantha Ruth Prabhu New haircut : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे समंथाचे चाहते नाराज झाले होते. पण अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत असला तरी सोशल मीडियावर मात्र चांगलीच चर्चेत आहे.
Aadesh Bandekar Suchitra Bandekar : 500 रुपयांचं खोटं मंगळसूत्र, पळून जाऊन लग्न; आदेश-सुचित्रा बांदेकरांची स्ट्रगलवाली लव्हस्टोरी जाणून घ्या...
Aadesh Bandekar Suchitra Bandekar Lovestory : आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) सध्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे.
Aadesh Bandekar Suchitra Bandekar : 500 रुपयांचं खोटं मंगळसूत्र, पळून जाऊन लग्न; आदेश-सुचित्रा बांदेकरांची स्ट्रगलवाली लव्हस्टोरी जाणून घ्या...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
