Suchitra Bandekar: 'दार उघड बये दार उघड म्हणणारा आदेश...'; सुचित्रा बांदेकर यांचा खास उखाणा, व्हिडीओ व्हायरल
सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांनी घेतलेल्या उखाण्यानं अनेकांचे लक्ष वेधले.
Suchitra Bandekar: अभिनेत्री सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) या चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. सुचित्रा या सध्या त्यांच्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सुचित्र बांदेकर यांना उखाणा घेण्याचा आग्रह प्रेक्षकांनी केला. त्यानंतर सुचित्रा यांनी घेतलेल्या उखाण्यानं अनेकांचे लक्ष वेधले.
'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाच्या टीमनं एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांनी सुचित्र बांदेकर यांना उखाणा घेण्याचा आग्रह केला. त्यानंतर सुचित्रा यांनी उखाणा घेतला. “दार उघड बये दार उघड म्हणणारा आदेश आहे तसा भला, बांदेकर उभ्या महाराष्ट्रभर फिरता, कधी-मधी आपल्याही घरी येत चला” असा उखाणा या कार्यक्रमामध्ये सुचित्रा बांदेकर यांनी घेतला.
सुचित्रा बांदेकर यांनी या उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी सुचित्रा यांच्या या उखाण्याचं कौतुक केलं आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
'बाईपण भारी देवा' या चित्रपटात त्यांनी पल्लवी ही भूमिका साकारली आहे. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटामध्ये सुचित्रा बांदेकर यांच्यासोबतच रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुकन्या मोने,शिल्पा नवलकर आणि दीपा परब या अभिनेत्रींनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 30 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
View this post on Instagram
सुचित्रा बांदेकर यांचे चित्रपट आणि मालिका
सुचित्रा बांदेकर या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. त्यांनी झिम्मा, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, फुल-3 धम्माल या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हम पांच, अवंतिका, वहिनीसाहेब या मालिकांमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. आता त्यांच्या बाईपण भारी देवा या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या
Baipan Bhaari Deva : पत्नीसोबत सिनेमा पाहायचाय आ जाओ, दिखा देंगे; 'बाईपण भारी देवा'चं हटके प्रमोशन