Bollywood Actress : नव्वदच्या दशकातील 'ॲड क्वीन', सलमान-अक्षयसोबत काम, रेखाने मारली होती कानाखाली! ओळखलं का?
Bollyood Actress : जाहिरात क्षेत्र गाजवणाऱ्या एका मॉडेलने अभिनय क्षेत्रदेखील गाजवलं आहे. सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्या चित्रपटांत तिने काम केलं आहे. पण आता ही अभिनेत्री सिनेसृष्टीपासूनही दूर आहे.
![Bollywood Actress : नव्वदच्या दशकातील 'ॲड क्वीन', सलमान-अक्षयसोबत काम, रेखाने मारली होती कानाखाली! ओळखलं का? Ad Queen of 90 This Bollywood Actress Worked With Salman Khan Akshay Kumar Heart Was Broken When Rekha Slapped Her Know Bollywood Entertainment Latest Update Marathi News Bollywood Actress : नव्वदच्या दशकातील 'ॲड क्वीन', सलमान-अक्षयसोबत काम, रेखाने मारली होती कानाखाली! ओळखलं का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/13b087a2996356ef14b9a442079acabe1714218835719254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bollywood Actress : एक छोटी मुलगी 80-90 च्या दशकात छोट्या पडद्यावरील अनेक जाहिरातींमध्ये दिसून यायची. आपल्या दिलखेचक अदा आणि अभिनयाने ती छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालत होती. मॉडेल म्हणून सुरू झालेला छोट्या मुलीचा प्रवास पुढे बॉलिवूडपर्यंत पोहोचला. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), सलमान खान (Salman Khan) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना ती दिसून आली. बॉलिवूड गाजवणारी ही अभिनेत्री आता सिनेसृष्टीपासून दूर आहे. छोट्या पडद्यासह रुपेरी पडदा गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आरती छाबडिया (Aarti Chabria) आहे. आरती छाबडिया अक्षय कुमारच्या 'आवारा पागल दीवाना', 'हे बेबी' आणि सलमान खानच्या (Salman Khan) 'पार्टनर' (Partner) या चित्रपटात दिसून आली आहे. पण आता मात्र अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून गायब आहे.
सेटवर गेलंय बालपण
आरती छाबडियाने सोशल मीडियावर आपल्या बालपणीची झलक शेअर केली आहे. बालपणी काम केलेल्या विविध जाहिरातींचे फोटो आरतीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. टू इन वन, बबलू टूथपेस्ट, सनसिल्क शॅम्पू, ईजी लिक्विड डिटरजेंटसारख्या जाहिरातींमध्ये ती दिसून येत आहेत. फोटो शेअर करत आरतीने लिहिलं आहे,"बालपणी प्रत्येक रविवारी मी सेटवर जात असे आणि अॅक्शन हा शब्द ऐकल्यानंतर अॅक्टिव्ह होत असे. मैत्रिणींसोबत खेळण्यासाठीही माझ्याकडे वेळ नसे. मी खूप कमी वयात काम करायला सुरुवात केली आहे. कामाला देव माणून ते योग्य पद्धतीने पूर्ण करण्यावर माझा भर होता".
View this post on Instagram
सिनेसृष्टीपासून आहे दूर
आरती छाब्रियाने जाहिरात क्षेत्रासह मनोरंजनसृष्टीतही चांगलं काम केलं आहे. अनेक नामांकित कलाकारांसोबत तिने काम केलं आहे. 'लज्जा' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला अभिनेत्री रेखाकडून मारदेखील खावा लागला होता. रेखाने कानशिलात लगावल्याने ती खूप दु:खी झाली होती. अभिनयप्रवास योग्य दिशेने सुरू होता. पण 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाचा चार्टेड अकाऊंट विशारद बीडासीसोबत ती लग्नबंधनात अडकली. त्यानंतर भारत सोडून ती ऑस्ट्रेलियाला गेली. आरती सध्या रायझिंग फीनिक्स हे प्रोडक्शन हाऊस चालवत आहे. तसेच म्युझिक व्हिडीओचंदेखील दिग्दर्शन करते.
संबंधित बातम्या
Yash : खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)