नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Nanded Loksabha Election : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळालाय. रवींद्र चव्हाण यांनी 1457 मतांनी विजय खेचून आणलाय.
Nanded Loksabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबरोबरच नांदेड लोकसभेची पोट निवडणूक देखील पार पडली. राज्यभर महायुतीने दिमाखदार विजय मिळवलेला नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार रवींद्र चव्हाण दिवसभर पिछाडीवर असलेले पाहायला मिळाले. मात्र दिवसभर पिछाडीवर असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी शेवटच्या काही टप्प्यांत डाव पलटवला आणि विजयश्री खेचून आणली आहे. वसंत चव्हाण यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये विजय मिळवला होता. मात्र, निवडणूक झाल्यानंतर अवघ्या 4 महिन्यांत त्यांचे निधन झाले होते.
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण हे विजयी झालेत . शेवटपर्यंत रंगलेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात रवींद्र चव्हाण यांचा 1457 मतांनी विजय झाला. विधानसभेत नांदेड जिल्ह्यातील सर्व नऊ जागा महायुतीने जिंकल्या. मात्र लोकसभेची पोट निवडणुक काँग्रेसने जिंकली आहे.
नांदेड जिल्ह्यात नव्या जोमाने काँग्रेसला उभी करणार
मी नांदेडच्या जनतेचे आभार मानतो .. स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या आशीर्वाद , आणि जनतेची साथ यामुळे हा माझा विजय आहे . अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली .. जिल्ह्यात सर्व जागा महायुतीला गेल्या , मात्र काँग्रेसच्या पडत्या काळात स्वर्गीय वसंत चव्हाण यांनी गड राखला होता .. त्यामुळे जनतेने आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला साथ दिली असं रविंद चव्हाण म्हणाले . आता माझ्यावर जबाबदारी आहे .. नांदेड जिल्ह्यात नव्या जोमाने काँग्रेसला उभी करणार , अशी प्रतिक्रिया देखील रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या