इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण, प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawan) धमकी प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या (Kolapur Police) ताब्यात आला आहे.

कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawan) धमकी प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या (Kolapur Police) ताब्यात आला आहे. प्रशांत कोरटकरच्या पत्नीने पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केला आहे. कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी छावा सिनेमा प्रदर्शित झाला. याच सिनेमावर बोलताना इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना ब्राह्मणद्वेशी विचार मांडल्याचा आरोप प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं केला होता. तसेच इंद्रजीत सावंतांना धमकीही दिली होती. त्याची ऑडिओ क्लिप सावंतांनी सोशल मीडियात पोस्ट केली होती. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच प्रशांत कोरटकर माध्यमांसमोर आले. ती धमकी आपण दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण त्यानंतर ते गायब झाले आहेत. दरम्यान सावंतांना धमकी देणाऱ्या आणि शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक व्हावी या मागणीसाठी कोल्हापुरात निदर्शन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तत्काळ अटक झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकर पसार
दरम्यान, इंद्रजित सावंतांना फोनवरुन धमकी देणारा आणि शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणारा आरोपी नेमका कोण? तो फोन नागपूरच्याच प्रशांत कोरटकरांनी केला होता का? जर नाही तर ते नॉट रिचेबल का झाले? आणि ते कुठे गायब झाले? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उकल पोलीस लवकरच करतील. त्यादृष्टीने पोलिसांचा तपासही सुरु आहे. प्रशांत कोरटकरविरोधात कोल्हापूरमध्ये जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या शोधासाठी कोल्हापूरहून नागपूरमध्ये पोलिसांचे पथक पोहोचले आहे. मात्र, प्रशांत कोरटकर राहत्या घरातून पसार झाला आहे. त्याचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ लागत असून त्याचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा फोन बंद असल्याची माहिती नागपूरमधील बेलतरोडी पोलिसांनी दिली आहे. प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशात लपल्याचा आरोप केला जात आहे. यापूर्वी सुद्धा गुन्हा दाखल होताच प्रशांत कोरटकर बालाघाटला पळाल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असला, तरी अजून सापडलेला नाही.
महत्वाच्या बातम्या:
Kolhapur News : प्रशांत कोरटकर धमकी प्रकरण; सीएम फडणवीसांसमोर कोल्हापुरात शिवप्रेमी आणि इंडिया आघाडी ठाम आंदोलन करण्यावर ठाम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

