Maharashtra Vidhnsabha Election 2024 : 20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार, दिग्गजांचे गड ढासळले, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात दिग्गजांचा पराभव
Maharashtra Vidhnsabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीनंतर 20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झालीये. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झालाय.
Maharashtra Vidhnsabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीने जवळपास 233 जागांवर आघाडी मिळवली आहे, तर महाविकास आघाडीला केवळ 51 जागांवर आघाडी मिळवता आली आहे. त्यामुळे महायुतीचा दारुण पराभव झालाय.
कोणत्या पक्षाची किती जागांवर आघाडी?
भारतीय जनता पक्षाने 136 , शिवसेना शिंदे गटाने 56 तर अजित पवार गटाने 41 जागांवर आघाडी मिळवली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. ठाकरे गटाने 16, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 14 तर काँग्रेसने 21 जागांवर आघाडी मिळवली आहे.
20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार, कोण कोणते जिल्हे?
धुळे, जालना, छ. संभाजीनगर, बीड, हिंगोली, धाराशिव, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग , नाशिक, जळगाव
कोण कोणते नेते पराभूत ?
राजेश टोपे
बाळासाहेब पाटील
पृथ्वीराज चव्हाण
बाळासाहेब थोरात
धीरज विलासराव देशमुख
ऋतुराज पाटील
पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय. ते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपचे अतुल भोसले असा सामना रंगला होता. या लढतीत अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केला आहे. कराड दक्षिणमध्ये 17 व्या फेरीनंतर अतुल भोसले यांनी 38 हजार मतांचा लिड मिळवला होता. पृथ्वीराज चव्हाण यांना हा लीड तोडण्यात अपयश आलंय.
यशोमती ठाकूर यांचाही पराभव
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपने यशोमती ठाकूर यांच्याविरोधात राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. राजेश वानखेडे यांच्याकडे 21 फेऱ्यांनंतर 8195 मतांचा लीड होता. अखेर आता यशोमती ठाकूर यांचा पराभव झाल्याचे निश्चित मानले जात आहे.
बाळासाहेब थोरात यांचा देखील पराभव
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. बाळासाहेब थोरात सातत्याने या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, यावेळी मतदारांनी त्यांचा आमदार बदलला आहे. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून अमोल खटाळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. अमोल खटाळ यांनी थोरातांचा 10 हजार 560 मतांनी पराभव केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Radhanagari Vidhan Sabha : प्रकाश आबिटकरांची हॅट्ट्रिक; राधानगरी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच एखाद्या आमदाराची अशी कामगिरी