CSK vs MI Dream11 Team : MS धोनी, रोहित शर्मासह 'या' 11 खेळाडूंना संधी द्या व्हाल करोडपती, CSK vs MI मॅचची ड्रीम-11, कर्णधार अन् उपकर्णधार कोण?
Chennai Super Kings VS Mumbai Indians IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) 22 मार्चपासून सुरू होणार आहे, परंतु स्पर्धेतील हाय-व्होल्टेज सामना 23 मार्च रोजी चेन्नईमध्ये खेळला जाईल.

Chennai Super Kings VS Mumbai Indians IPL 2025 Dream11 Prediction : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) 22 मार्चपासून सुरू होणार आहे, परंतु स्पर्धेतील हाय-व्होल्टेज सामना 23 मार्च रोजी चेन्नईमध्ये खेळला जाईल. या सामन्यात आयपीएलमधील दोन सर्वात यशस्वी संघ एकमेकांसमोर येतील. आतापर्यंत तुम्हाला अंदाज आला असेलच की आपण कोणत्या सामन्याबद्दल बोलत आहोत.
खरंतर, चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने येतात तेव्हा चाहत्यांच्या नजरा या हाय व्होल्टेज सामन्यावर असतात. कारण दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहेत. चेन्नई आणि मुंबईने प्रत्येकी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. म्हणूनच या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. चेन्नई येथे होणारा हा सामना नक्कीच रंगतदार होईल. जर तुम्ही आजच्या सामन्यासाठी फॅन्टेसी 11 संघ निवडणार असेल, तर तुम्हाला मार्गदर्शन करणारी बातमी आहे. होय. आम्ही तुम्हाला सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूबद्दल सांगणार आहोत.
पिच रिपोर्ट
चेन्नईतील चेपॉक स्टेडियम सामान्यतः फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. पण जर फलंदाजांनी सुरुवातीला संयम राखला तर फलंदाज येथेही चमत्कार करू शकतात. नियमित कर्णधार हार्दिक पांड्या बंदीमुळे खेळत नसल्याने मुंबई इंडियन्स सामन्यात थोडे कमकुवत दिसू शकते, तर चेन्नई सुपर किंग्ज घरच्या स्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यासाठी ड्रीम टीम-
विकेटकीपर - महेंद्रसिंग धोनी
फलंदाज - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, डेव्हॉन कॉनवे.
अष्टपैलू खेळाडू - रवींद्र जडेजा, मिशेल सँटनर, सॅम करन, शिवम दुबे.
गोलंदाज - मथिशा पाथिराना, मुजीब उर रहमान, दीपक चहर
कर्णधार - महेंद्रसिंग धोनी
उपकर्णधार - सूर्यकुमार यादव
---------------------------------------
विकेटकीपर - रायन रिकेलटन
फलंदाज - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा
अष्टपैलू खेळाडू - रवींद्र जडेजा, मिशेल सँटनर
गोलंदाज – नूर अहमद, मथिशा पाथिराना.
कर्णधार - ऋतुराज गायकवाड
उपकर्णधार - मथिशा पाथिराना
कर्णधार आणि उपकर्णधार कोणाला बनवावे?
या फॅन्टेसी लीग संघाच्या कर्णधाराबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड किंवा रोहित शर्मा यापैकी कोणालाही निवडू शकता. याशिवाय, उपकर्णधारपदासाठी तिलक वर्मा, मथिशा पाथिराना, दीपक चहर आणि रायन रिकेल्टन यांच्या रूपात अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
नोट - फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.





















