वयाच्या 70 व्या वर्षी चौथ्यांदा वाजवले होते सनई चौघडे, बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये ' विलन' अशी ओळख, 30 वर्षांनी लहान असलेल्या मुलीबरोबर थाटला होता संसार
kabir bedi wife parveen dusanj : वयाच्या 70 व्या वर्षी चौथ्यांदा विवाह उरकला, बॉलिवूडमध्ये 'विलन' म्हणून क्रूर भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने 30 वर्षांनी लहान असलेल्या मुलीबरोबर थाटला संसार

kabir bedi wife parveen dusanj : कबीर बेदी बॉलिवूडमधील मोठं नाव...मात्र ते जेवढं त्यांच्या अभिनयाबाबत चर्चेत राहिले नाहीत, तेवढे त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत चर्चेत राहिले. कबीर यांचे तीन घटस्फोट झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, तिसऱ्या पत्नीला सोडल्यानंतरही ते थांबले नाहीत. त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी 2016 मध्ये 30 वर्षांनी लहान असलेल्या परवीन दोसांझ हिच्याशी विवाह उरकला होता. त्यानंतर कबीर बेदी चर्चेत आले होते. त्यामुळे कबीर बेदी आणि परवीन दोसांझ एकत्र आल्यानंतर त्यांनी नेहमी चर्चा रंगते. नुकताच आशितोष गोवारीकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी दोघांनी उपस्थिती लावली होती.
View this post on Instagram
आशितोष गोवारीकर यांच्या मुलाचा लग्नात कबीर यांचा स्टाईलीश लूक पाहायला मिळाला, तर परवीन साध्या आणि सिंपल सूटमध्ये सुंदर दिसत होती. लूकपेक्षा तिच्या चेहऱ्यांवरिल हास्याची चर्चा पाहायला मिळाली. 79 वर्षीय कबीर यांना 49 वर्षीय परवीन सोबत पाहिल्यानंतर सर्वांची नजर त्यांच्याकडे गेली. त्यांची जोडी या विवाह सोहळ्यात चर्चचा विषय ठरली होती. दरम्यान , या विवाह सोहळ्यात परवीनचा लूक अतिशय सिंपल होता. व्हाईट कलरचा सूटमध्ये ती डॅशिंग दिसत होती.
कबीर बेदी यांनी वयाच्या 70 व्या वर्षी केला होता चौथ्यांदा विवाह
कबीर बेदी यांनी फक्त बॉलिवूडमध्येच नाही, तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने छाप सोडल होती. अभिनेता कबीर बेदी जेम्स बाँड सीरिजमधील 13 वा चित्रपट 'ऑक्टोपसी' मध्येही झळकलेले पाहायला मिळाले होते. त्यांनी या चित्रपटात त्याने एका बॉडीगार्ड म्हणून भूमिका साकारली होती. या चित्रपटात रॉजर मूरने जेम्स बाँडच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. या चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
कबीर बेदींचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय
कबीर बेदी एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल 4 वेळेस प्रेमात पडले. त्यांनी 2016 साली चौथ्यांदा लग्न केलं. कबीर बेदी आणि परवीन दोसांझ हे सुमारे 10 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याला एक नवीन नाव दिलं.
परवीन बाबी यांच्याशी देखील कबीर बेदींचं खास नातं
70 च्या दशकात परवीन बाबी यांच्यासोबत देखील कबीर बेदींचं रिलेशन होतं. कबीर बेदी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या आणि परवीन बाबीच्या नात्या काही कॉम्पिकेशन असल्या तर प्रेमही तेवढेच होते. परवीन बाबीच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे या नात्यावर परिणाम झाला. मानसिक आजाराशी लढताना परवीन बाबीला अनेक अडचणी आल्या आणि अखेर हे नाते तुटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'जशी पोटगी कायदेशीर केली तसाच हुंडा देखील..', नाना पाटेकरांच्या वक्तव्यानंतर करुणा शर्मा संतापल्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

