'जशी पोटगी कायदेशीर केली तसाच हुंडा देखील..', नाना पाटेकरांच्या वक्तव्यानंतर करुणा शर्मा संतापल्या
Karuna Sharma on Nana Patekar : 'जशी पोटगी कायदेशीर केली तसाच हुंडा देखील..', नाना पाटेकरांच्या वक्तव्यानंतर करुणा शर्मा संतापल्या

Karuna Sharma on Nana Patekar, Mumbai : "नाना पाटेकर (Nana Patekar) साहेबांची मी एक पोस्ट बघितलेली आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की, जशी पोटगी कायदेशीर आहे, तसाच हुंडा देखील कायदेशीर व्हायला पाहिजे, असं ते म्हणाले. त्यांना आता मी एकच सांगते. नाना भाऊ..महिलांची जी व्यथा असते...आपलं घर, परिवार सोडून स्वत:चं अस्तित्व लपवून पुरुषाचं अस्तित्व निर्माण करती आहे. त्यानंतर जरी तो पुरुष तिला सोडतोय. दोन मुलं बाळं झाल्यानंतर रोडवर सोडतोय. ती महिला कुठे जाणार? पोटगी नाही मागणार का? त्याच्यावर तुम्ही भाष्य करत आहात. हुंडा कायदेशीर का व्हायला पाहिजे? स्त्री जर नसती तर पुरुष निर्माण झाला नसता", असं करुणा शर्मा (Karuna Sharma)म्हणाल्या. माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि त्यांच्यामध्ये सुरु असलेल्या पोटगीबाबतच्या लढ्यासाठी त्या न्यायालयात आल्या होत्या. यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्यावर भाष्य केलं.
मुंडे-शर्मा पोटगी प्रकरणावर 29 तारखेला अंतिम सुनावणी
करुणा शर्मा म्हणाल्या, न्यायायलायाने आम्हाला 29 तारीख दिलेली आहे. आम्ही 29 तारखेला न्यायालयात युक्तीवाद करणार आहोत. त्यामुळे आम्हाला ती तारीख देण्यात आलेली आहे. आमदारकीच्या निर्णयाबाबत कोर्टाने 1 एप्रिल ही तारीख दिलेली आहे. कोर्टाने मला दोन लाख रुपये दिले आहेत. त्यातून मी समाधानी नाही. आम्हाला कमीत कमी 15 लाख रुपये मिळावेत, अशी मागणी आम्ही न्यायालयात केली होती. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा याचिका दाखल करणार आहोत. आम्ही 15 लाख रुपये मागितले होते, तर आता कमीत कमी वाढवून 9 लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी देखील आम्ही केली आहे.
आम्हाला खालच्या कोर्टाने दोन लाख रुपये मेंटनर्स दिलेला आहे. आमची मागणी पंधरा लाखांची होती. आम्ही नव्या याचिकेत याचा उल्लेख केलेला आहे. आमचा कोर्टाचा खर्च 25 लाख रुपये झालेला आहे. ते देखील आम्हाला द्यायला हवा, ही मागणी आम्ही इथे देखील केलेली आहे. आमची केस ज्या कोर्टामध्ये चालू आहे, तिथे देखील ही मागणी केलेली आहे, असंही करुणा शर्मा यांनी नमूद केलं.
करुणा शर्मांचे वकील काय काय म्हणाले?
करुणा शर्मांचे वकिल म्हणाले, धनंजय मुंडे यांनी जी याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेविरोधात आम्ही आमचं लेखी म्हणणं दाखल केलेलं आहे. आम्ही आमचे कायदेशीर पॉईंट उपस्थित केलेले आहेत. कोर्टाने आता 29 तारखेला अंतिम सुनावणी ठेवलेली आहे. हा मॅटर अर्जंट असल्यामुळे ही सुनावणी 29 तारखेला ठेवली आहे. आमच्या क्लाईंटची आर्थिक परिस्थिती खराब आहे. दोन मुलं सांभाळायची आहेत, त्यांचा शिक्षणाचा खर्च आहे. माजी मंत्र्यांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणून देखील आम्ही मुद्दा उपस्थित केलाय.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

