KKR विरुद्ध RCB सामना पावसामुळे रद्द झाला तर... कोणत्या संघाला होणार फायदा? जाणून घ्या आयपीएलचे नियम
आज कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर आयपीएल 2025 चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय होईल ते जाणून घ्या.

KKR vs RCB Rain Prediction : आज कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर आयपीएल 2025 चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. पण चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे, खरंतर स्पर्धेचा पहिलाच सामना पावसामुळे खराब होऊ शकतो. कोलकातामध्ये पावसाच्या आणि वादळाच्या शक्यतेमुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. निश्चित वेळापत्रकानुसार उद्घाटन समारंभ सायंकाळी 6 वाजता सुरू होणार आहे, तर सामना 7:30 वाजता सुरू होईल. पण जर पावसामुळे केकेआर (KKR) विरुद्ध आरसीबी (RCB) सामना पूर्णच झाला नाही तर काय? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत आहेत.
सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल?
जर कोलकाता आणि बेंगळुरूचा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना एक-एक गुण दिले जातील. कारण आयपीएलच्या लीग सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नसतो. तसेच जेव्हा कोणताही संघ जिंकतो तेव्हा त्याला 2 गुण मिळतात, तर हरलेल्या संघाला कोणतेही गुण दिले जात नाहीत. सामना बरोबरीत राहिल्यास त्यांना एक-एक गुण मिळेल.
संध्याकाळी हवामान कसे असेल?
कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या वेळी कोलकात्यात पावसाची फक्त 10 टक्के शक्यता आहे, परंतु वादळाचा इशारा देण्यात आला आहे. तर रात्री 11 वाजेपर्यंत पावसाची शक्यता 70 टक्के सांगितली जात आहे. अशा परिस्थितीत सामना सुरू झाला तरी पावसाचा अनेकदा खंड पडू शकतो.
हा सामना खास असणार आहे कारण गेल्या हंगामाच्या तुलनेत दोन्ही संघांकडे नवीन कर्णधार आहे. कोलकाताचे कर्णधार अजिंक्य रहाणे असतील, तर दुसरीकडे आरसीबीची कमान रजत पाटीदारच्या हाती आहे. सामन्यापूर्वी सहा वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. या उद्घाटन समारंभात श्रेया घोषाल, करण औजला आणि दिशा पाटणी देखील येणार आहेत. याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील समारंभात सहभागी होऊ शकतात.
कोलकाता नाईट रायडर्स संघ : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमनदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, रहमानुल्ला गुरबाज, मनीष पांडे, मोईन अली, अनरिच नोर्टजे, रोवमन पॉवेल, अनुकुल रॉय, मयंक मार्कंडे, चेतन सकारिया, लवनीथ सिसोदिया
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ : विराट कोहली, फिलिप साल्ट, देवदत्त पडिकल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल, स्वप्नील सिंग, लुंगी एनगिडी, रोमारियो शेफर्ड, मनोज भंडागे, रसिक दार सलाम, नुवान तुषारा, जेकब बेथेल, सुयश शर्मा, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा, अभिनंदन सिंग
हे देखील वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

