VIDEO : युजवेंद्र चहलशी घटस्फोट झाल्यानंतर धनश्री वर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...
Dhanashree Verma and Yuzvendra Chahal : 2 वर्षांचा संसार, 4.75 कोटींची पोटगी; युझी चहलशी घटस्फोट झाल्यानंतर धनश्री वर्मा पहिल्यांदाच समोर; प्रतिक्रिया देताना म्हणाली...

Dhanashree Verma and Yuzvendra Chahal : कोरिओग्राफर धनश्री वर्मा आणि भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल यांचा दोन दिवसांपूर्वी घटस्फोट झालाय. दरम्यान, धनश्री वर्माला युझवेंद्र चहलकडून 4.75 कोटी रुपये पोटगी म्हणून मिळाले आहेत. दरम्यान, घटस्फोटानंतर सोशल मीडियावर धनश्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पैशांसाठी लग्न केलं होतं, असं म्हणत नेटकरी धनश्री वर्माला ट्रोल करत आहेत. दरम्यान, चहलसोबत घटस्फोट घेतल्यानंतर पहिल्यांदाच धनश्री वर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
धनश्री वर्मा काय काय म्हणाली?
धनश्री वर्माचे पापाराझी फोटोशूट करत होते. यावेळी त्यापैकी एकाने धनश्री वर्माला काल झालेल्या घटस्फोटाबाबत काही बोलायचं आहे का? असा प्रश्न विचारला. यावर धनश्रीने उत्तर दिले नाही. तिने हाताने इशारा करुन बोलण्यास नकार दिलाय. मात्र, याचवेळी ती तिच्या नव्या रिलीज झालेल्या गाण्याबाबत बोलली आहे. तुम्ही पहिलं माझं गाणं ऐका, असं आवाहन धनश्रीने यावेळी केलंय. यावेळी पापाराझींनी गाण्याचे कौतुक केल्यानंतर धनश्रीने त्यांचे आभार मानले आहेत.
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलचा घटस्फोट
चहल आणि धनश्री यांचा विवाह 2020 मध्ये झाला होता. मात्र, 20 मार्च 2025 रोजी त्यांचा घटस्फोट झाला. दरम्यान, ते लग्नाच्या 2 वर्षांनंतर वेगळे राहू लागले आहेत. म्हणजेच घटस्फोटाच्या 18 महिने अगोदरच ते वेगळे राहत होते. घटस्फोटाच्या दिवशी, चहलचे वकील नितीन कुमार गुप्ता यांनी एएनआयला सांगितले होते की, "न्यायालयाने घटस्फोटाचा निकाल दिला आहे आणि दोघं आता पती-पत्नी राहिलेले नाहीत."
View this post on Instagram
युजवेंद्र चहल आता पंजाब किंग्जकडून खेळणार
राजस्थान रॉयल्सकडून सलग तीन हंगाम खेळल्यानंतर युजवेंद्र चहल आता आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. IPL 2025 च्या मेगा लिलावात चहलला पंजाब किंग्जने 18 कोटी रुपयांना विकत घेतले. चहलच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर 2013 पासून आतापर्यंत त्याने या स्पर्धेत 160 सामने खेळले आहेत आणि 205 विकेट्स पटकावल्या आहेत. चहल बराच काळ भारतीय संघाबाहेर आहे. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात तो टीम इंडियाचा भाग होता. मात्र त्यानंतर त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

