गेल्या वर्षी तीन महिन्यात अस्त्र मायक्रोवेव्ह प्रोडक्टसच्या शेअरनं दुप्पट परतावा दिला आहे.
बीएसईवर हा शेअर 637 रुपयांवर ट्रेड करतोय.
अस्त्र मायक्रोव्हेवचा शेअर 11 एप्रिल 2003 ला 4.38 रुपये होता. सध्या 637 वर आहे. म्हणजे ज्यांनी त्यावेळी 71 हजार रुपयांचे शेअर खरेदी केले असतील कोट्यधीस झालेत.
गेल्या वर्षी 14 मार्च 2024 ला हा शेअर 510 रुपयांवर होता. पुढच्या तीन महिन्यात तो 1059.75 पोहोचला होता. सध्या तो 637 रुपयांवर आहे.
अस्त्र मायक्रोवेव प्रोडक्टस सध्या संरक्षण, टेलिकॉम, स्पेस क्षेत्रासाठी फ्रीक्वेन्सी सिस्टीम, मायक्रोवेव चिप्स, मायक्रोवेव बेस्ड कम्पोनेंटस तयार करते.
तिसऱ्या तिमाहीत या कंपनीचं उत्पन्न 12 टक्क्यांनी वाढलं. तर, नफा 15 टक्क्यांनी वाढला.
अस्त्र मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्सला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा 9 टक्के झाला आहे.
कंपनीला 2024-25 मध्ये 674 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. जियोजित फायनान्सनं या कंपनीच्या शेअरची टारगेट प्राईस 768 रुपये निश्चित केलीय.
शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही.