Ajit Pawar: शरद पवारांकडून कामाचं कौतुक; अजित पवार म्हणाले, "कौतुक चांगलं वाटतंय पण..."
Ajit Pawar: 30 वर्षे अजित पवारांनी कामं केली. माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्या संदर्भात कुठली ही तक्रार नाही, असं शरद पवारांनी म्हटलं होतं त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरूध्द पवार अशी निवडणूक झाली. त्यानंतर आता विधानसभेला देखील पवार विरूध्द पवार अशी लढत होणार आहे. या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य केलं. '30 वर्षे अजित पवारांनी कामं केली. माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्या संदर्भात कुठली ही तक्रार नाही', असं शरद पवारांनी शिर्सुफळमध्ये प्रचाराची सभा घेताना म्हटलं, त्यावर अजित पवारांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द झाला, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अजित पवार मिश्किलपणे हसत म्हणाले, "चांगलं वाटतंय", त्याचबरोबर आता नवीन पिढीला संधी दिली पाहिजे या शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, "ते चांगलं नाही वाटतं".
साहेबांनी कौतुक केलं ते चांगले वाटतं. साहेब पुढचं नवीन पिढीला संधी द्या म्हणाले ते चांगलं नाही वाटतं. आता मी काय म्हातारा दिसायला लागलो आहे का? पाहिजे ते करायला तयार आहे. नाही केलं तर पवारांंचं नाव सांगणार नाही असंही पुढे हसत अजित पवार म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
'30 वर्षे अजित पवारांनी कामं केली. माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्या संदर्भात कुठली ही तक्रार नाही.', असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मी 30 वर्षांपूर्वी लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतला. कारण, 30-35 वर्षे सतत निवडून गेल्यानंतर नवी पिढी तयार करण्याची गरज असते. त्यानुसार मी इथली सर्व जबाबदारी अजित पवारांकडे सोपवली. मागील 25-30 वर्षांपासून ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. पहिली 30 वर्षे माझ्यावर आणि त्यानंतरची 30 वर्षे अजित पवारांवर. आता पुढल्या 30 वर्षांची व्यवस्था करण्याची गरज आहे. ती करायची असेल तर लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यात लक्ष घालण्याची दृष्टी हवी', असे म्हणत शरद पवारांनी म्हटलं होतं.
अजित पवारांचा जाहीरनामा प्रसिध्द
जाहीरनाम्यात काय आहे?
लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार आहे.
सोबत महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे
धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजर रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एम.एस.पी वरती 20% अनुदान देण्याचा वादा अजित दादांच्या पक्षाकडून करण्यात आलेला आहे.
वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे.
वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.
दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा करण्यात आलेला आहे.
25 लाख रोजगार निर्मितीचा वादा देखील केला आहे.