एक्स्प्लोर

Jitendra Awhad : त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र

Jitendra Awhad letter to Rahul Narwekar : जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना इतिहासाची आठवण करून देत पत्र लिहिले आहे.

Jitendra Awhad letter to Rahul Narwekar : कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना  मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. यानंतर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना इतिहासाची आठवण करून देत पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी माणिकराव कोकाटे यांना तातडीने विधानसभेतून निष्कासित करण्याची मागणी केली आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्याही पेक्षा निकालपत्रात न्यायालयाने नमूद केलेल्या बाबी अत्यंत गंभीर आहेत. अतिरिक्त मुख्य न्यायालयीन दंडाधिकारी, नाशिक यांनी आपल्या निकालपत्रात म्हटलं आहे की, "आरोपी क्रमांक 1 (माणिक कोकाटे) स्वतः राजकारणी आणि वकील असूनसुद्धा आणि त्यांना परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला गेला आणि कायद्याची अवहेलना केली गेली. गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखावणारं हे कृत्य असून वैयक्तिक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली गेली. मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण बेकायदेशीर कृत्ये केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही. कोणीही असलं तरी फसवणुकीचे गुन्हे माफ करणं योग्य नाही, हा संदेश देणं आवश्यक आहे. 

इतिहासाची आठवण करून जितेंद्र आव्हाडांची मागणी

राज्यात डिसेंबर 2023 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शेअर घोटाळ्यात माजी मंत्री सुनिल केदार यांचा सहभाग आढल्यामुळे त्यांना अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांनी पाच वर्षे कारावास व साडेबारा लाख रुपयाचा दंड ठोठावला, त्यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या अपात्रतेची अधिसूचना काढली. न्यायालयाचा निकाल आणि अस्तित्वात असलेल्या भारतीय कायद्याचा विचार करता माणिकराव कोकाटे यांना विधानसभा सदस्यपदावरून त्वरीत निष्कासित करण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या, आता बंदुकीचा परवानाही रद्द होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?

Manikrao Kokate : पाचव्यांदा आमदारकी, अजितदादांनी सोपवली मंत्रीपदाची धुरा, आता 1995 सालचं प्रकरण कृषीमंत्री कोकाटेंच्या अंगलट

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Custodial Death | Ghatkopar प्रकरणी 2 पोलिसांना 7 वर्षांची शिक्षा
Akshay Shinde encounter | पोलिसांना क्लीन चिट, पण SIT चौकशीचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
Beed Woman Attack | अंजनमती गावात महिलेला निर्दयी मारहाण, पाय तोडण्याचा प्रयत्न
Cough Syrup Deaths | बालकांच्या मृत्यूने सरकार अलर्ट, पुण्यात औषधांचा मोठा साठा जप्त
Shilpa Shetty Travel Ban | अभिनेत्री Shilpa Shetty ला परदेश प्रवासाची परवानगी नाकारली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
Chhagan bhujbal: अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
Navi Mumbai International Airport: ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
रोहित शर्माची नवी कोरी टेस्ला कार, फ्रंट सीटवर बसून मारली राईड; गाडीचा नंबर खास; काय आहे मागील स्टोरी?
रोहित शर्माची नवी कोरी टेस्ला कार, फ्रंट सीटवर बसून मारली राईड; गाडीचा नंबर खास; काय आहे मागील स्टोरी?
Embed widget