(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RBI चा 2 कोटी लोकांना दिलासा, पेटीएम बँकेत डिपॉझिटची अंतिम मुदत वाढवली
Paytm Payments Bank Crisis: आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेतील ठेवी आणि इतर व्यवहारांची अंतिम मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली आहे.
Paytm Payments Bank Crisis: रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी बहुप्रतिक्षित FAQ जारी केले. FAQ मध्ये, रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या विविध सेवांबाबत लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या शंकाचं निरसण करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच पेटीएम फास्टॅग वापरणाऱ्या करोडो लोकांना दिलासा दिला आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेत (Paytm Payments Bank) पैसे जमा करण्याची किंवा फास्टॅग रिचार्ज करण्याची अंतिम मुदत आता 29 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळं 2 कोटी लोकांना दिलासा मिळाला आहे.
RBI ने नेमका काय घेतला निर्णय?
पेटीएम पेमेंट्स बँकेत पैसे जमा करण्याची किंवा फास्टॅग रिचार्ज करण्याची अंतिम मुदत आता 29 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ पेटीएम फास्टॅग वापरकर्ते 15 मार्चपर्यंत त्यांचा फास्टॅग वापरतात तसाच वापर करू शकतात. तथापि, 15 मार्चनंतर परिस्थिती पूर्वीसारखी राहणार नाही.
RBI ने 31 जानेवारीला केली होती कारवाई
पेटीएम फास्टॅग पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केला आहे, ज्यावर रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात कारवाई केली आहे. 31 जानेवारी रोजी कारवाई करताना रिझर्व्ह बँकेने 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँक किंवा वॉलेटमध्ये पैसे जोडता येणार नाहीत, असे सांगितले होते. पेटीएम फास्टॅग वॉलेटशी लिंक करून काम करत असल्याने 29 फेब्रुवारीनंतर रिचार्ज करण्यावर बंदी होती. आता रिझर्व्ह बँकेने वापरकर्त्यांना थोडा दिलासा दिला असून त्यांना काही दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे. आरबीआयच्या कारवाईपूर्वी जवळपास 2 कोटी लोक पेटीएम फास्टॅग वापरत होते. रिझर्व्ह बँकेच्या FAQ नुसार, आता ते वापरकर्ते 15 मार्चनंतर त्यांचा पेटीएम फास्टॅग रिचार्ज करू शकणार नाहीत. जर त्यांच्या फास्टॅगमध्ये आधीपासूनच पैसे असतील तर ते 15 मार्चनंतरही उर्वरित पैसे वापरु शकतात. रिझर्व्ह बँकेची बंदी फास्टॅगच्या वापरावर नाही, तर रिचार्ज करण्यावर आहे.
दरम्यान, लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न होता की ते त्यांच्या पेटीएम फास्टॅगमधील पैसे इतर कोणत्याही बँकेने जारी केलेल्या फास्टॅगमध्ये ट्रान्सफर करु शकतात का? मात्र, ते करता येणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. RBI च्या मते, सध्या फास्टॅग उत्पादनामध्ये शिल्लक पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा नाही. अशा परिस्थितीत, वापरकर्ते त्यांचे पेटीएम फास्टॅग शिल्लक इतर कोणत्याही फास्टॅगमध्ये हस्तांतरित करू शकत नाहीत.
दरम्यान, निर्बंधानंतर आणखी काही फास्टॅग वापरायचे असतील तर त्यांच्या जुन्या पेटीएम फास्टॅगचे काय होईल? त्यांना उर्वरित शिल्लक पैसे परत मिळतील का? याबाबत, रिझर्व्ह बँकेच्या FAQ मध्ये असे सांगण्यात आले आहे की वापरकर्त्यांना त्यांच्या बँकेशी संपर्क साधावा लागेल. तसेच त्यांना त्यांचा जुना पेटीएम फास्टॅग बंद करावा लागेल. त्यानंतर ते बँकेकडून परतावा मागू शकतात.
पेटीएम फास्टॅग कसा बंद करायचा?
पेटीएम ॲपमध्ये लॉग इन करा
मॅनेज फास्टॅग पर्यायावर जा
तुमच्या नंबरशी लिंक केलेला फास्टॅग दिसेल
आता तळाशी असलेल्या हेल्प अँड सपोर्ट पर्यायावर जा
नॉन-ऑर्डर संबंधित प्रश्नांसाठी मदत हवी आहे? यावर क्लिक करा
FASTag प्रोफाइल अपडेट करण्याशी संबंधित प्रश्न हा पर्याय उघडा
मला माझा फास्टॅग बंद करायचा आहे यावर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या: