एक्स्प्लोर

Beed News: हाल हाल करुन मारतील, 'त्या' 3 मुंडेंबद्दल बीडच्या शिक्षकाची आणखी एक पोस्ट समोर

Beed News: बीडमध्ये एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या शिक्षकाने तब्बल 18 वर्ष शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. पण इतके वर्ष काम करूनही वेतन काही मिळालं नाही.

बीड:  बीडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या गुन्ह्यांमुळे महाराष्ट्र हादरला आहे, सरपंचाचे अपहरण त्यांची हत्या आणि मारहाणीच्या वारंवार समोर येणाऱ्या घटना यामुळे राजकारण देखील तापलं आहे. कुणाला कुठे मारहाण होते, तर कोणाला मारहाण होते, कोणाचा खून होतो. बीडमध्ये अशीच एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या शिक्षकाने तब्बल 18 वर्ष शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. पण इतके वर्ष काम करूनही वेतन काही मिळालं नाही. त्यामुळे या शिक्षकाने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. पण आत्महत्येच्या आधी दोन दिवसांपासून त्यांनी 'आता एकच विषय विषय खलास, विषय संपला विषयाला पूर्ण विराम. मी जगणं कधीचच सोडलेलं आहे. बघू पुढे भविष्यात काय काय होतंय ते' अशी पोस्ट फेसबुकवर केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी सोशल मिजियावर पोस्ट लिहून संताप व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

बीड शहरातील स्वराज्य नगर भागातील ही घटना आहे. धनंजय अभिमान नागरगोजे असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. नागरगोजे यांनी बीड शहरातील कृष्णा अर्बन बॅकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन जीवन संपवलं. आत्महत्येआधी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्याचबरोबर आपल्या आत्महत्येला फक्त आणि फक्त विक्रम बाबुराव मुंडे आणि विजयकांत विक्रम मुंडे तसंच अतूल विक्रम मुंडे हेच जबाबदार असतील असं म्हटलं आहे, या पोस्टनंतर त्यांनी आणखी एक पोस्ट केली होती. सदरील या व्यक्तींना जर आवर नाही घातला तर माझ्यापाशी आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. जर यांनी मला गाठलं तर हे माझे हाल हाल करून मला मारतील' अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. एवढंच नाहीतर, ही माणसं माझ्या घरी आली तर मला छळ करून मारतील, असा दावाही त्यांनी केला होता.

कोण आहेत धनंजय नागरगोजे?

धनंजय अभिमान नागरगोजे जिल्ह्याच्या केज तालुक्यातील केळगाव येथील रहिवासी आहेत. ते मागील 18 वर्षांपासून विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. 18 वर्षांपासून काम करत असूनही वेतन मिळत नसल्याच्या कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. 2019 मध्ये राज्य सरकारने या शाळेला 20 टक्के अनुदान घोषित केलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही.

 नागरगोजे यांची भावनिक पोस्टमध्ये 

धनंजय अभिमान नागरगोजे आपल्या पोस्टमध्ये लेकीसाठी म्हणाले की, "श्रावणी बाळा तुझ्या बापुला शक्य झालंच तर माफ कर. मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती. पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं. काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. मी कधी कुणाला दोन रूपयांना फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलं नाही. श्रावणी बाळा शक्य झालंच, तर तुझ्या बापूला एकदा माफ कर. कारण मी तुला एकटीला सोडून जात आहे. तुला अजून काहीच कळत नाही, तुझं वय आहेच किती... तीन वर्षे... तुला काय कळणार.... ज्यांना कळायला पाहिजे होतं, त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगला वागला. पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड आणि ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे यांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हालहाल करून मारणार आहेत. मला मारण्याचं कारण म्हणजे मी त्यांना फक्त विचारलं होत की, मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे काम करतोय. मला अजून पगार नाही. आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा होशील आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा होईल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तसेच विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे, गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत. कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे. यांच्या मुळेच मी माझे जीवन संपवत आहे. आत्ता पर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मोठ्या मनाने माफ करा. सर्वांना माझा शेवटचा राम राम.... अशी भावनिक पोस्ट नागरगोजे यांनी शेअर केली होती.

 विजय कुंभार यांची पोस्ट

“मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही…" 18 वर्षे शाळेसाठी काम केलं, पण पगाराबाबत विचारलं तर उत्तर मिळालं – “फाशी घे!"  म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा. धनंजय नागरगोजे नावाच्या बीड जिल्ह्यातील एका शिक्षक बापाने अखेरचा श्वास घेताना आपल्या ३ वर्षांच्या लेकराला लिहिलेल्या ह्या शब्दांनी मन सुन्न होतं. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याला असं संपवलं जातं का?  ही नावं वाचा… विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे,अतूल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे , ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे, गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड ही फक्त यादी नाही, ही नावं आहेत त्या शिक्षण संस्थेच्या चालकांची. न्याय मिळायलाच हवा!, अशी पोस्ट विजय कुंभार यांनी शेअर केली आहे.

अंजली दमानियांची पोस्ट

ज्या लोकांचा उल्लेख धनंजय नागरगोजे यांनी त्यांच्या फेसबुक च्या सुसाइड नोट मध्ये केला आहे, त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे का अशी विचारणा मी श्री नवनीत कावत यांच्याकडे केली. ते म्हणत आहेत की धनंजय च्या वडिलांनी तक्रार दाखल केली नाही. त्या संस्थेला सरकार काढून पैसे मिळाले नाही म्हणून त्यांच्यावर आरोप करतात येणार नाही. Suo Moto FIR करा अशी विनंती मी त्यांना केली, पण तस करता येणार नाही असं ते म्हणाले. उद्या पुन्हा त्यांच्याशी बोलेन. पण सरकार काहीतरी करेल असे त्यांचे म्हणणे आहे, अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शेअर केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget