एक्स्प्लोर

SIP Investment : एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात? तर त्याआधी 'या' गोष्टी जाणून घ्या!

SIP Investment Plan : तुम्हाला SIP चा पूर्ण फायदा घ्यायचा असेल, तर तुम्हाला SIP मध्ये नियमितपणे गुंतवणूक करत राहावे लागेल.

SIP Investment Tips : म्युच्युअल फंडात (Mutual Funds) गुंतवणुकीचा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे एसआयपी (SIP) म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना (Systematic Investment Plan). SIP द्वारे, तुम्ही नियमित अंतराने म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून दीर्घकाळासाठी चांगला निधी जमा करू शकता. दरम्यान, सर्व SIP गुंतवणूकदारांना चांगला आणि एकसारखा परतावा मिळतो असं नाही. अनेक उदाहरणं अशी आहेत, ज्यामध्ये पहिल्या दोन-तीन वर्षांत SIP परतावा नकारात्मक राहिला आहे. तर काहींना भरघोस परताना मिळाला आहे. तुम्हाला SIP चा पूर्ण फायदा घ्यायचा असेल, तर तुम्हाला SIP मध्ये नियमितपणे गुंतवणूक करत राहावे लागेल. 

SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात?

अनेकदा असे दिसून येते की, गुंतवणूकदार घाबरून SIP मधून पैसे काढतात, ज्याचे परिणाम त्यांना स्वतःला भोगावे लागतात. जर तुम्हाला यशस्वी एसआयपी गुंतवणूक करायची असेल आणि तुम्हाला SIP च्या पूर्ण क्षमतेने फायदा घ्यायचा असेल, तर तुम्हाला SIP मध्ये नियमितपणे गुंतवणूक करत राहावे लागेल. एसआयपीमध्ये गुंतवणूक करणार असाल तर त्याआधी काही गोष्टी नक्की घ्या.

एसआयपीला गुंतवणुकीदारांची पसंती

एसआयपीच्या माध्यमातून भारतातील गुंतवणूक झपाट्याने वाढली आहे. AMFI डेटानुसार, सात वर्षांपूर्वी एसआयपीद्वारे मासिक योगदान 3 हजार कोटी रुपये होते, ते आता 16 हजार रुपये प्रति महिनाच्या पुढे गेलं आहे. एसआयपी गुंतवणुकीसाठी लोकप्रिय पद्धत ठरली आहे. एसआयपी लोकांना त्यांच्या गुंतवणुकीचे योग्य नियोजन करण्यास मदत करते. याचे अनेक फायदे असले तरी, त्याचे काही तोटेही आहेत. यामुळे, प्रत्येकाने एसआयपी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

जोखीम घेण्याच्या क्षमतेचे परतावा अवलंबून

एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याच्या सर्वात आधी तुमचं आर्थिक उद्दिष्ट ठरवा. आर्थिक उद्दिष्ट ठरवणे ही SIP चं नाही तर कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीची पहिली पायरी आहे. तुमचे उद्दिष्ट दीर्घकालीन आहे की अल्पकालीन हे ठरवल्याने गुंतवणुकीचा पर्याय निवडणं सोपं होईल. एसआयपी करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन केलं पाहिजं. तुम्हाला अनेक SIP मध्ये जास्त परतावा मिळू शकतो, पण तिथेही जोखीम जास्त असते. त्याच वेळी, कमी जोखमीच्या योजनांमध्ये परतावा देखील कमी असतो. त्यामुळे तुम्ही किती जोखीम घेऊ शकता, यावरही तुमचा परतावा अवलंबून असतो.

पैसे गुंतवण्यापूर्वी सखोल अभ्यास करा

SIP पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असावा. वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ जोखीम आणि परतावा संतुलित करण्यास मदत करेल. कोणत्याही एसआयपीमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी, योजनेचा सखोल अभ्यास करा. योजना तपासण्यासोबतच फंड हाऊस तपासणंही महत्त्वाचं आहे. गुंतवणुकीच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्त. जेव्हा तुम्ही पूर्ण शिस्तीने नियमितपणे गुंतवणूक करता तेव्हाच SIP प्रभावी ठरते आणि यातूनच तुम्ही जास्तीत जास्त परतावा मिळवू शकता.

(Disclaimer : ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.) 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Post Office Kisan Vikas Patra Scheme : पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! काही दिवसात पैसे दुप्पट, 5 लाख रुपये जमा करून 10 लाख रुपये मिळवा, 1000 रुपयांपासून गुंतवणूक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP MajhaSthanik Swarajya Sanstha :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर Ravindra Chavan प्रदेशाध्यक्ष?Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
Embed widget