एक्स्प्लोर

Pune Crime: प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये चिमुकल्या बाळांचे अवयव, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 7 अर्भकं फेकून दिली, दौंडमधील धक्कादायक दृश्य

Pune Crime: नेमके हे अर्भकं कोणत्या रुग्णालयाने फेकून दिले आहेत, याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे.

दौंड:  पुणे जिल्ह्यातील दौंड (Daund Crime News) शहरालगत असणाऱ्या बोरावकेनगर भागामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये सहा ते सात अर्भक आढळून आले आहे. प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये भरून अर्भक कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कचऱ्यामध्ये सहा ते सात बरण्यांमध्ये भरून हे अर्भक उघड्यावर फेकून दिल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. नेमके हे अर्भक कोणत्या रुग्णालयाने फेकून दिले आहेत, याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे. (Daund Crime News) 

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड (Daund Crime News) शहरालगत असणाऱ्या बोरावके नगरमध्ये प्राईम टाऊनच्या पाठीमागे कचऱ्याच्या ढिगार्‍यात ही अर्भक आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आले आहेत. यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी ही अर्भक आणि मानवी शरीराचे अवशेष हे प्रयोगशाळेतील नमुने असल्याची माहिती मिळत असली तरी हा गर्भपाताचा प्रकार आहे का? या दृष्टीने देखील पोलीस तपास करीत आहेत.(Daund Crime News) 

स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करून या संदर्भातील माहिती दिली. यानंतर तातडीने दौंड पोलीस (Daund Crime News) घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी अंती पंचनामा करून डॉक्टरांचे वैद्यकीय पथक या ठिकाणी बोलावले. हे अर्भक आणि अवशेष ताब्यात घेण्यात आले असून हे या ठिकाणी कसे आले? कोणी टाकले?  हा गर्भपाताचा प्रकार आहे का? याचा शोध आता घेतला जात आहे. वैद्यकीय तज्ञांच्या अहवालानुसार यानंतर पोलीस पुढील कारवाई केली जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे अर्भक आणि काही मानवी शरीराचे अवशेष सीलबंद भरणीत भरलेले असून त्यावरती त्या संदर्भातील माहिती देखील आहे आणि ते 2020 मधील आहेत, अशी माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे. मात्र हे कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये कसे आले याचा शोध घेतला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on Amol Kolhe: अमोल कोल्हेंच्या सावित्रीबाईं फुलेंच्या मालिकेसाठी रोहित पवारांकडून 50 लाखांची मदत; म्हणाले 'थोर विचारांना पुढे नेताना अनेक अडचणी...'
अमोल कोल्हेंच्या सावित्रीबाईं फुलेंच्या मालिकेसाठी रोहित पवारांकडून 50 लाखांची मदत; म्हणाले 'थोर विचारांना पुढे नेताना अनेक अडचणी...'
Girish Mahajan on Operation Blue Star: ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे काळा दिवस, गिरीश महाजनांचं पंजाबमध्ये वक्तव्यं, केंद्रातील भाजपश्रेष्ठी नाराज, म्हणाले...
ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे काळा दिवस, गिरीश महाजनांचं पंजाबमध्ये वक्तव्यं, केंद्रातील भाजपश्रेष्ठी नाराज, म्हणाले...
Pune Congress: पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अरविंद शिंदेंची प्रदेशाध्यक्षांविरोधात हायकमांडकडे तक्रार, नेमकं काय घडलंय?
पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अरविंद शिंदेंची प्रदेशाध्यक्षांविरोधात हायकमांडकडे तक्रार, नेमकं काय घडलंय?
Maharashtra School: राज्यातील शाळा कधी सुरु होणार, 15 जून की 22 जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
राज्यातील शाळा कधी सुरु होणार, 15 जून की 22 जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Godavari River Boat Accident: बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
Shivaji Patil on Satej Patil: मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
Chhagan Bhujbal NCP: सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
Amol Kolhe On Me Savitribai Jyotirao Phule: 'जे आडवे येतील, त्यांच्या छाताडावर पाय देऊन...'; शरद पवारांसमोरच 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंनी घेतला मोठा निर्णय
'जे आडवे येतील, त्यांच्या छाताडावर पाय देऊन...'; शरद पवारांसमोरच 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंनी घेतला मोठा निर्णय
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरील गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरील गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
Supreme Court India: लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget