एक्स्प्लोर

4600 कोटींची संपत्ती, मलबार हिलवर राजवाड्याला लाजवेल असं घर, अब्जावधींची गुंतवणूक; बॉलिवूडची सर्वांत श्रीमंत अभिनेत्री

Indias richest actress : भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीकडे 4600 कोटींची संपत्ती आहे.

Indias richest actress : आपल्याला कोणी विचारलं की, बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री (Indias richest actress) कोण? तर आजच्या घडीला कोणीही आलिया भट (Alia Bhatt), दीपिका पादुकोण (Deepika Padukon) यांच्या सारख्या अभिनेत्रींची नावे सांगेन. पण जर तुम्ही असा विचार करत असाल की, सिनेमात काम करण्यासाठी कोट्यावधींची रक्कम आकारणाऱ्या अभिनेत्री सर्वात श्रीमंत असतील तर तसं नाही. बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीचं नाव प्रेक्षकांसाठी नवं नाही. सध्या जरी ती सिनेमात काम करत नसली तरी तिने एकेकाळी बॉलिवूडला हिट सिनेमे दिले आहेत. यातून तिने कोट्यवधींची कमाई केली आहे. 

Hurun Rich List 2024 मधून बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण? याबाबतची माहिती समोर आली होती. श्रीमंतीच्या बाबतीत तिने ऐश्वर्या रायला देखील मागे टाकले आहे. या यादीनुसार, जुही चावला (Juhi chawla) बॉलिवूडची सर्वांत श्रीमंत अभिनेत्री आहे. तिच्याकडे 4600 कोटींची संपत्ती आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल कारण  गेल्या काही वर्षांमध्ये जुही चावलाचा एकही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही. तिने 2009 साली केलेला एक सिनेमा तिचा आत्तापर्यंतचा शेवटचा हिट सिनेमा ठरला होता. 

जुही चावलाकडे एवढी संपत्ती आहे? 

तुम्हाला वाटतं असेल की, खरंच जुही चावलाकडे (Juhi chawla) एवढी संपत्ती आहे? ती सध्या सिनेमात काम करत नसली तिने मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. याशिवाय तिचं एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. यातून ती दरवर्षी कोट्यावधी रुपये कमावते. बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे देणाऱ्या जुहीने रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. याशिवाय आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सच्या संघावरही तिची सह मालकी आहे. 

जुही चावल्याने नव्वदीच्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे केले. यावेळी तिने मिस इंडियाचा किताबही जिंकला होता. अभिनेता आमीर खान सोबतच्या 'कयामत से कयामत तक' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, या सिनेमातून तिला जास्त कमाई करता आली नव्हती. जुही आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच केकेआर या संघाची सहमालकीण आहे. 

केकेआरची सहमालकीण आहे जुही चावला 

केकेआरची मालकी शाहरुख खान आणि जुही चावलाने (Juhi chawla) संयुक्तरित्या बाळगली आहे. जुही चावला आणि तिचा पती जय मेहता आणि शाहरुख खानने आयपीएलमधील केकेआरचा संघ 623 कोटी रुपयांना खरेदी केला होता.  फोर्ब्सच्या मते, केकेआर या संघाची सध्याची किंमत 1.1 अब्ज डॉलर्स (सुमारे 9,139 कोटी रुपये) आहे. 

जुही चावला आयपीएलमधील  संघाची सह-मालकीण तर आहेच..पण महत्त्वाचं म्हणजेच ती रेड चिलीज ग्रुपची सह-संस्थापक देखील आहे. जी शाहरुख खानची प्रॉडक्शन कंपनी आहे. याशिवाय, जुही चावलाचा पती मोठा उद्योगपती आहे. सौराष्ट्र सिमेंट लिमिटेड ही जुही चावलाचा पतीची कंपनी आहे. मेहता ग्रुपच्या अशा अनेक कंपनी आहेत. जुहीने रिअल इस्टेट, रेस्टॉरंट्स आणि लक्झरी प्रॉपर्टीजमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे.

मुंबईतील मरबार हिलवर घर, पोरबंदरमध्येही आलीशान बंगला 

मुंबईतील सर्वात महागड्या भागांपैकी एक असलेल्या मलबार हिलवर जुही चावलाचं आलीशान घरं आहे. तिचं हे घर अनेक मजल्यांचं आहे. याशिवाय तिचे एक आलिशान घर आहे, ज्यामध्ये अनेक मजले आहेत. गुस्तोसो (इटालियन) आणि रु डू लिबान (लेबनीज) ही दोन आलिशान रेस्टॉरंट्स आहेत. जुही आणि जय मेहता यांचा पोरबंदरमध्ये एक मोठा बंगला देखील आहे.

जुही चावला सध्या बॉलिवूडमध्ये किंवा सिनेक्षेत्रात काम करत नसेल पण ती कॅमेऱ्यापासून दूर राहिलेलीन नाही. तिने मॅगी, पेप्सी, कुरकुरे, रूह अफजा, केलॉग्स, इमामी बोरोप्लस आणि केश किंग आयुर्वेदिक ऑइल सारख्या ब्रँडच्या जाहिराती देखील केल्या आहेत. जाहिरातींच्या माध्यमातून देखील जुही मोठी कमाई करते. याशिवाय तिच्या महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. बीएमडब्ल्यू 7-सिरीज (1.8 कोटी रुपये), मर्सिडीज-बेंझ एस-क्लास (1.7 कोटी रुपये), जॅग्वार एक्सजे (1.2 कोटी रुपये) आणि पोर्शे (1.36 कोटी रुपये) या महागड्या गाड्या तिच्याकडे आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बिल गेट्सशी 3300 कोटींची डील करणाऱ्या बड्या उद्योगपतीशी ऐश्वर्या रायला करायचं होतं लग्न, सलमानकडून जळाला होता त्याचा हात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Terror Crackdown: फरीदाबादमध्ये जैश-ए-मोहम्मदचे स्लीपर सेल उद्ध्वस्त, दोन डॉक्टरांसह सात जणांना अटक
Delhi Blast: 'सर्व अँगलने तपास करू', गृहमंत्री Amit Shah यांचा इशारा; मृतांचा आकडा ८ वर
Red Fort Blast: फरीदाबादमधून ३६० किलो स्फोटकं जप्त, डॉक्टर अटकेत; दिल्ली स्फोटामागे 'व्हाईट कॉलर' दहशतवाद्यांचा हात?
Delhi Blast: 'स्फोटामागे घातपात आहे का?' अमित शहा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी NSG कमांडो दाखल
Delhi Blast: 'सखोल चौकशी करणार', लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोटात ११ ठार; गृहमंत्री अमित शहा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Delhi Blast : नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
Embed widget