जालना मारहाणप्रकरणात गुन्हा दाखल करणारे पोलीस अधिकारी भाजप नेत्याच्या इतक्या जवळचे की..' अंबादास दानवेंचा रावसाहेब दानवेंवर नाव न घेता गंभीर आरोप
सध्या या तालुक्यात जो कोणी भाजप विरोधी काम करतोय त्याला गुन्ह्यांत अडकवून अडचणीत आणतात आणि भाजप मधे घेतात असा सर्रास प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

Jalna: जालना जिल्ह्यातील भोकरदनमधून बोराडे नावाच्या व्यक्तीला जुन्या वादातून एका व्यक्तीस अमानुष मारहाण करून त्याला लोखंडी सळईने चटके दिल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे (Jalna Crime) गटाच्या तालुकाध्यक्षाच्या भावाला पोलिसांनी अटक करण्यात आली होती. दरम्यान, यात भाजप नेत्याने दबाव टाकून नवनाथ दौड याच्यावर गुन्हा दाखल केला. भोकरदन येथे काम करणारे पीआय माने आणि डीवायएसपी हे दोघे स्थानिक भाजप नेत्याचा इतक्या जवळचे आहेत की त्यांनी केवळ भाजप नेत्याचा घरी पाणी भरण बाकी असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी नाव न घेता रावसाहेब दानवेंवर केला. (Ambadas Danve on Raosaheb Danve)
काय म्हणाले अंबादास दानवे?
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात बोराडे नावाच्या व्यक्तीला चटके देण्याचा प्रकार समोर आला या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. ज्याला चटके देण्यात आले तो स्वत सांगत होता की नवनाथ दौड याचा सहभाग नाही तरी सुद्धा स्थानिक नेत्याचा दबावामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक भाजप नेत्याने पीआय माने यांच्यावर दबाव टाकून नवनाथ दौड याच्यावर गुन्हा दाखल केला.
ज्यावेळी गुन्हा दाखल झाला त्यावेळी दौड हा आपल्या कुटुंबासोबत प्रयागराज येथे होता मात्र स्थानिक नेत्याचा दबावामुळे दौडवर गुन्हा दाखल करण्यात आला .भोकरदन येथे काम करणारे पीआय माने आणि डीवायएसपी हे दोघे स्थानिक भाजप नेत्याचा इतक्या जवळचे आहेत की त्यांनी केवळ भाजप नेत्याचा घरी पाणी भरण बाकी असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला.सध्या या तालुक्यात जो कोणी भाजप विरोधी काम करतोय त्याला गुन्ह्यांत अडकवून अडचणीत आणतात आणि भाजप मधे घेतात असा सर्रास प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
कैलास बोराडे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून, जुन्या वादातून आरोपीने ही मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. बोराडे हे एका मंदिरात दर्शनासाठी गेले असता जुन्या वादातून आरोपी सोबत बाचाबाची झाली. अशातच हा वाद विकोपाला जाऊन किरकोळ मारहाण आणि त्यानंतर जवळच असलेल्या एका पेटत्या चुलीत रॉड टाकून आरोपींने चक्क चटके दिल्याचा प्रकार घडला . या प्रकरणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये हा घटनाक्रम नमूद करण्यात आला. या प्रकरणी उबाठाचा तालुकाध्यक्ष नवनाथ दौड आणि त्याच्या भावा विरोधात पारध पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचा अधिक तपास सध्या पोलीस करत असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
