'राजसंन्यास', 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'बेबंदशाही', 'थोरातांची कमळा' कलाकृतींवर बंदीची मागणी, सभागृहात मंत्र्यांचं उत्तर, म्हणाले....
'राजसंन्यास', 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'थोरातांची कमळा', 'बेबंदशाही', 'प्रणयी युवराज', 'स्वप्न भंगले रायगडाचे' व 'इथे ओशाळला मृत्यू' आदी नाटके, चित्रपटांवर बंदी आणावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.

Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य, सोशल मीडिया पोस्ट करण्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. दरम्यान,राज्य विधानपरिषदेत संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेल्या जुन्या पुस्तकं, नाटकं आणि चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सोमवारी केलीय. यात 'राजसंन्यास' ही राम गणेश गडकरी यांची कादंबरी, तसेच 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'थोरातांची कमळा', 'बेबंदशाही', 'प्रणयी युवराज', 'स्वप्न भंगले रायगडाचे' आणि 'इथे ओशाळला मृत्यू' यासारख्या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकांचा समावेश आहे. दरम्यान, यावर सभागृहात मंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिलंय. छत्रपती संभाजी महारांबद्दलच्या अवमानकारक मजकूरावर कायमस्वरूपी बंदी आणण्याची प्रक्रीया सुरु केल्याचं मंत्री भोयर म्हणाले. यामध्ये विकिपीडिया, यूट्युब आणि समाजमाध्यमांवरील महापुरुषांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आलेत असेही ते म्हणाले.छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्य निर्मितीसाठी चरित्र साधने समिती नेमण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचं ते म्हणालेत.
नक्की काय झालं सभागृहात?
आमदार अमोल मिटकरींनी संभाजीराजेबद्दल आक्षेपार्ह छापलेल्या जुनी पुस्तकं आणि नाटकांवर बंदी घालण्याची काल विधानपरिषदेत मागणी केली. यामधे विकिपीडिया, यूट्युब आणि समाजमाध्यमांवरील महापुरुषांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.विकिपीडिया, शासकीय मुद्रणालयात उपलब्ध असलेले संपूर्ण गडकरीमधील राजसंन्यास या कादंबरी सह गुगल, यूट्युब, कादंबऱ्या, चित्रपट व कपोलकल्पित कथेवर कायमस्वरूपी बंदी घालावी व मानहानिकारक चित्रपट काढून टाकावेत. 'राजसंन्यास', 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'थोरातांची कमळा', 'बेबंदशाही', 'प्रणयी युवराज', 'स्वप्न भंगले रायगडाचे' व 'इथे ओशाळला मृत्यू' आदी नाटके, चित्रपटांवर बंदी आणावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरींनी छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान करणारी 20 नाटके, 40 पुस्तके आणि काही सिनेमे जी छत्रपती संभाजी महाराजांविषयी अपमान करणारी आहेत. ज्यात अधिक अपमानजनक सामग्री आहे आणि काही नाटक आणि पुस्तके राज्य छापून प्रकाशित केली आहेत. मी पुस्तके छापणे, प्रकाशन आणि वितरणावर प्रतिबंध लावण्याची मागणी करतो अशी मागणी त्यांनी केली होती.
यावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ग्रंथसंपदा प्रकाशित करण्यासाठी इतिहास संशोधकांची चरित्र साधने समिती नेमण्याबद्दल सकारात्मक असून यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे भोयर म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते.अशा पद्धतीने साहित्यावर बंदी घातली गेली तर एक काळ गाजवलेल्या साहित्यकृती कायमच्या सम्ृतीतून नष्ट होतील आणि लेखकाचं कल्पना स्वातंत्र्या हा मुद्दा लक्षात घेतलाच जात नाहीए यामधे वसंत कानिटकर, राम गणेश गडकरी यांची ऐतिहासिक नाटकंही आहेत.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
