Chhaava Screening at Parliament House: मोदी-शाह स्वराज्याच्या धाकल्या धन्यांचा पराक्रम याचि देहि याचि डोळा पाहणार, संसदेत छावाचं विशेष स्क्रिनिंग
Chhaava Screening at Parliament House: 2025 चा सुपरहिट चित्रपट 'छावा' एकीकडे बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे . आता या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Chhaava Screening at Parliament House: विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर चित्रपट 'छावा' (Chhaava Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालतोय. चित्रपटानं आतापर्यंत भल्याभल्या दिग्गजांचे रेकॉर्ड्स चक्काचूर केले आहेत. एकीकडे 'छावा' बॉक्स ऑफिस गाजवतोय, तर दुसरीकडे राज्यात 'छावा' (Chhaava) चित्रपटानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद समोर आला आहे. आता या सगळ्या गदारोळात आज 'छावा' चित्रपटाचं संसदेत स्क्रिनिंग ठेवण्यात आलं आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 39 दिवसांनी 'छावा' चित्रपटाचं संसदेत स्क्रिनिंग केलं जाणार आहे. या खास स्क्रिनिंगसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय नेते उपस्थित असणार आहेत.
'छावा' चित्रपट या वर्षीच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. 'छावा' केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर राजकीय वर्तुळातही चर्चेत आहे. चित्रपटानंतर औरंगजेबावरुन वाद सुरू झाला, तो थेट त्याच्या कबरीच्या मुद्द्यापर्यंत जाऊन पोहोचला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, विधीमंडळ अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवरही भरपूर कमाई करत आहे. चित्रपटाच्या भरघोस कमाईत, तो आता संसदेत प्रदर्शित होत आहे.
View this post on Instagram
संसदेत 'छावा'चं विशेष स्क्रिनिंग?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संसदेत आज (मंगळवारी) 'छावा' चित्रपटाचं स्क्रिनिंग केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि संसद सदस्य या स्क्रिनिंगसाठी उपस्थित राहतील. एवढंच नाहीतर, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विक्की कौशलसह चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट स्क्रिनिंगसाठी उपस्थित असणार आहे. यासोबत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजनही या स्क्रिनिंगसाठी उपस्थित राहणार आहेत.
आज संसदेत 'छावा' चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडणार आहे. या स्क्रिनिंगमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा विशेषतः उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याशिवाय भाजपचे अनेक मंत्री आणि खासदार देखील या स्क्रिनिंगमध्ये सहभागी होतील. संसद ग्रंथालय इमारतीच्या बालयोगी सभागृहात 'छावा' चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग पार पडले. 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मोदींनीही या चित्रपटाचं जाहीर कौतुक केलं होतं. आज पंतप्रधान मोदी 'छावा' चित्रपट संपूर्ण स्टारकास्टसोबत पाहणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी केलेलं कौतुक
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी 'छावा' चित्रपटाचं कौतुक केलं होतं. दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्र आणि मुंबईनं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला नव्या उंचीवर नेलं आहे. सध्या, 'छावा' देशभरात धुमाकूळ घालत आहे, त्यानंतर विक्की कौशल खूप आनंदी झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, 'छावा' चित्रपटात मुख्य भूमिकेत विक्की कौशल झळकला आहे. विक्की कौशलनं छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. याशिवाय महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना, मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नासह आशुतोष राणा, दिव्या दत्ता यांसारखे अनेक कलाकार झळकले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
