एक्स्प्लोर
IPL 2025 DC vs LSG Ashutosh Sharma: 11 चेंडूत झळकावलंय अर्धशतक; युवराज सिंगचा मोडलाय विक्रम, आशुतोष शर्माच्या नावावर भीमपराक्रम
IPL 2025 DC vs LSG Ashutosh Sharma: लखनौविरुद्ध आशुतोष शर्माने तडाखेबंद नाबाद अर्धशतक झळकावले.

IPL Ashutosh Sharma
1/7

आयपीएल 2025 च्या हंगामातील चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायट्स यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात दिल्लीने लखनौचा एक विकेट्सने पराभव केला. (Image Credit-IPL)
2/7

दिल्ली आणि लखनौचा हा सामना शेवटच्या षटकांपर्यंत गेला. एकावेळी लखनौ सामना सहज जिंकेल असे वाटत असताना दिल्लीकडून आशुतोष शर्मा आणि विप्राज निगम याने दमदार खेळी केली.(Image Credit-IPL)
3/7

आशुतोष शर्माने तडाखेबंद नाबाद अर्धशतक झळकावले. त्यामुळे लखनौने दिलेल्या 209 धावांचे लक्ष्य दिल्लीने 19.3 षटकांतच 9 बाद 211 धावा करून पार केले.(Image Credit-IPL)
4/7

2023 मध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आशुतोषने 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढला होता. (Image Credit-IPL)
5/7

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील क गटातील सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध आशुतोषने 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा 16 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. (Image Credit-IPL)
6/7

युवराज सिंगने 2007 च्या T20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.(Image Credit-IPL)
7/7

आशुतोष शर्मा यांचा जन्म 15 सप्टेंबर 1998 रोजी मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला होता. तो रेल्वेकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो.(Image Credit-IPL)
Published at : 25 Mar 2025 12:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
क्रीडा
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
