'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
Manoj Santoshi Passes Away: 'भाभी जी घर पर है' या प्रसिद्ध मालिकेचे लेखक मनोज संतोषी यांचं निधन झालं आहे.

Bhabiji Ghar Par Hai Writer Manoj Santoshi Passes Away: टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध मालिका 'भाभी जी घर पर है' (Bhabiji Ghar Par Hai) चे लेखक मनोज संतोषी यांचं वयाच्या 49व्या वर्षी निधन झालं. 23 मार्च रोजी सिरंदराबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोज संतोषी बऱ्याच काळापासून लिव्हरच्या समस्यांनी ग्रस्त होते. त्यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लान्टची शस्त्रक्रियाही केली जाणार होती. पण, आरोग्यासंबंधिच्या गुंतागुंतीच्या समस्यांमुळे त्यांचं निधन झालं. शिल्पा शिंदेनं 'इंडिया टुडे'शी बोलताना मनोज संतोषी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच, शिल्पा शिंदेनं डॉक्टरांवर खळबळजनक आरोपही केले आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि रुग्णालय प्रशासनाच्या सहकार्याच्या अभावामुळे मनोज संतोषी यांचा जीव घेल्याचं शिल्पा शिंदेनं म्हटलं आहे.
मनोज संतोषी हे बऱ्याच काळापासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी कविता कौशिकनं त्यांच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली होती. सौम्या टंडननं 'झूम'शी बोलताना सांगितलं की, "मनोजजी आता आपल्यात नाहीत, याबाबत विचार करणंही असह्य आहे. मला विश्वास बसत नाही की, मी त्यांना पुन्हा कधीही पाहू शकणार नाही, त्यांचा आवाज ऐकू शकणार नाही किंवा त्यांना गाताना ऐकू शकणार नाही. हे हृदयद्रावक आहे."
सौम्या टंडननं मनोज यांच्यासोबतच्या शेवटच्या भेटीबाबतही सांगितलं. सौम्या टंडन म्हणाली की, शो सोडल्यानंतरही ती त्यांच्या संपर्कात होती. लेखकासोबतच्या तिच्या शेवटच्या भेटीबद्दल बोलताना ती म्हणाली, 'ते उपचारासाठी हैदराबादला जाण्यापूर्वी मी त्यांच्या घरी गेले होते. आम्ही ठरवलं होतं की, ते बरे झाल्यावर, आम्ही आणखी एक मेहफिल करू, जी आम्ही घरी करायचो कारण मला गजरा आणि लोकसंगीताची खूप आवड आहे. म्हणून ते खूप गायक घेऊन येत असत. मी त्यांना सांगितलं होतं की, जर तुम्ही लवकर बरे झालात तर आपल्याला पार्टी करावी लागेल. तुम्ही गाणं गायलाच हवं. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मी खूप दुःखी झालेय. मी नेहमीच त्यांची ऋणी राहीन.
शिल्पा शिंदेचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
शिल्पा शिंदे म्हणाल्या की, रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मनोजचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी इच्छा केली असती तर ते त्याला वाचवू शकले असते. ती म्हणाली, 'मला मनोजजी लवकर बरे व्हावेत अशी इच्छा होती, कारण शूटिंगमधील सर्व लोकांनी त्यांना खूप पाठिंबा दिला होता. पण मनोजजी खूप हट्टी होते, ते नेहमीच थोडे एकटे राहायचे. आम्ही फारसे ऐकले नाही... मला कळताच, आम्ही खूप गोष्टी केल्या. मी त्यांचा रिपोर्ट पाहिला आणि म्हणाले, मनोज जी, आयुर्वेद वगैरे सध्या चालणार नाही. आपण आयुर्वेदाला चुकीचं म्हणतो कारण आपण चुकीच्या तारखांनुसार चालतो. फक्त आयुर्वेदानं काहीही 100% बरं होऊ शकत नाही, त्यासाठी वेळ आहे. आम्ही खूप प्रयत्न केले आणि बऱ्याच गोष्टी यशस्वी झाल्या, पण मला डॉक्टरांचा निष्काळजीपणा आवडला नाही... जणू काही त्यांना वाटत होतं की, त्यांच्या कुटुंबातील कुणीच नाही...
शिल्पा शिंदेची सिकंदराबादच्या डॉक्टरांची पोलखोल
शिल्पा शिंदेनं 'झूम'ला पुढे बोलताना सांगितलं की, "मी माझ्या कामासाठी 2 दिवसांसाठी मुंबईत आले... म्हणजे कोणी नसताना होणारा तो निष्काळजीपणा. थोडक्यात मी असं म्हणेन की, हा खूप वाईट बिझनेस आहे. हॉस्पिटल हा पैसे कमवण्याचा खूप चांगला बिझनेस झाला आहे. मृतांचेही डायलिसिस केलं जातंय, आपण किती मूर्ख आहोत. नाही, तुम्ही काय करत आहात ते आम्हाला समजत नाही. हा एक पूर्ण डॉक्टर आहे, सिकंदराबाद येथील KIMS रुग्णालय, जिथे यकृत प्रत्यारोपण केलं जातं, तिथे डॉक्टर आहेत की, न्हावी आहेत?"
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
