Lai Avadtes Tu Mala Colors Marathi Serial Track: सईचा धक्कादायक आरोप, पण सानिकाचा नवऱ्यावर ठाम विश्वास; सरकार दोषी की, निर्दोष?
Lai Avadtes Tu Mala Colors Marathi Serial Track: सरकार दोषी ठरेल की सानिका त्याला निर्दोष सिद्ध करेल? सईचा हा निर्णय परिस्थितीला कोणतं वळण देईल? हे जाणून घेणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.

Lai Avadtes Tu Mala Colors Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colors Marathi) लय आवडतेस तू मला (Lai Avadtes Tu Mala) मालिकेत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सरकार आणि सानिकाचे विधीवत लग्न होणार आहे. तसेच, सईचंही लग्न ठरणार असताना नाट्यमय ट्विस्ट समोर आला आहे. सईला लग्न करायचं नसतं, त्यामुळे ठरलेलं लग्न मोडण्यासाठी ती नवनव्या योजना आखते. त्याचवेळी तिला एका शेजारणीचा किस्सी समजतो आणि त्यावरुन ती सरकारला रंगपंचमीच्या दिवशी काही आठवतंय का? याची चाचपणी करते. मात्र, सरकारला काहीच आठवत नसल्याचं तिच्या लक्षात येतं. हीच संधी साधण्याचा सई निर्णय घेते आणि "आता दोन्ही लग्नं मोडणार!", असा दृढ निश्चय करते.
सईचा गोंधळलेला अवतार पाहून आप्पा तिला विचारतात, पण ती टाळाटाळ करते. अखेर, सततच्या चौकशीनंतर ती धक्कादायक खुलासा करते. सई म्हणते की, "सरकारनं नशेत मला सानिका समजून माझ्यावर हात टाकला" या आरोपानं घरात खळबळ माजते. दुसरीकडे, सानिका मंगळसूत्र खरेदी करत असताना अचानक अपशकुन घडतो, ज्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण होतं.
सईचा आरोप ऐकताच आप्पा संतप्त होऊन सरकारला खेचून बाहेर आणतात आणि पोलिसांत तक्रार करण्याचा आग्रह धरतात. मात्र, कमलला सईनं सांगितलेल्या घटनेवर विश्वास बसत नाही आणि ती त्यांना रोखते. आप्पा ठाम राहात, सरकारवर सईनं केलेल्या गंभीर आरोपांबाबत स्पष्ट बोलतात. यावरून वाद निर्माण होतो. खंबीरपणे बायको म्हणजेच, सानिका सरकारच्या पाठीशी उभी रहाते. सानिकाला सरकारवर पूर्ण विश्वास आहे. सरकार असं कधीच वागणार नाही. सानिका सरकारची बाजू घेत सईकडे पुरावा मागते आणि तिच्यावर खोटं बोलण्याचा आरोप करते. दरम्यान, सरकार आणि सानिका एक योजना आखतात. आता ही योजना काय असेल? ज्यामुळे सईची खोटी खेळी उघड होईल, हे मालिकेमध्ये कळेलच.
दरम्यान, आता हे सगळं सईला कळताच ती सर्वांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी थेट विहिरीत उडी मारते. आता पुढे काय होईल? सरकार दोषी ठरेल की सानिका त्याला निर्दोष सिद्ध करेल? सईचा हा निर्णय परिस्थितीला कोणतं वळण देईल? हे जाणून घेणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
