एक्स्प्लोर

टोल वसुलीचा विक्रम, टॉप 10 टोल प्लाझांनी फक्त 5 वर्षातच कमावले 14,000 कोटी रुपये 

एकीकडे देशात सातत्याने राष्ट्रीय महामार्ग बनवले जात आहेत. दुसरीकडे, या राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझाच्या कमाईत सातत्याने वाढ होत आहे.

Toll collection : एकीकडे देशात सातत्याने राष्ट्रीय महामार्ग बनवले जात आहेत. दुसरीकडे, या राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझाच्या कमाईत सातत्याने वाढ होत आहे. देशातील टॉप 10 टोल प्लाझांनी गेल्या 5 वर्षांत 14 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यामध्ये सर्वाधिक कमाई करणारा टोल प्लाझा दुसरा कोणी नसून वडोदरा-भरुचवरील सध्याचा भरठाणा टोल प्लाझा आहे. ज्यांची कमाई पाच वर्षांत 2 हजार कोटींहून अधिक झाल्याचे दिसून आले आहे.

20 मार्च रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) टोल प्लाझातून मिळणाऱ्या कमाईचे आकडे लोकसभेत सादर केले होते. देशातील टॉप 10 टोल प्लाझा कोणते आहेत आणि त्यांनी गेल्या पाच वर्षात किती कमाई केली आहे ते देखील आम्ही तुम्हाला सांगू.

देशातील प्रमुख टोल प्लाझाची कमाई किती?

गुजरातमधील NH-48 च्या वडोदरा-भरूच भागावर स्थित भरठाना, देशात सर्वाधिक वापरकर्ता शुल्क आकारणारा टोल प्लाझा आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांत (2019-20 ते 2023-24) 2,043.81 कोटी रुपये टोल जमा झाला आहे. ज्यामध्ये 2023-24 मधील सर्वाधिक 472.65 कोटी रुपयांच्या संकलनाचा समावेश आहे. 

यानंतर, राजस्थानचा शाहजहानपूर टोल प्लाझा आहे, जो दिल्ली ते मुंबईला जोडणारा NH-48 च्या गुडगाव-कोतपुतली-जयपूर सेक्शनवर आहे. एमओआरटीएच डेटा दर्शविते की गेल्या पाच वर्षांत, शाहजहानपूर टोल प्लाझावर 1,884.46 कोटी रुपयांचा टोल जमा झाला. 

पश्चिम बंगालचा जलधुलागोरी टोल प्लाझा तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 2019-20 ते 2023-24 या कालावधीत 1,538.91 कोटी रुपयांचा टोल वसूल केला. हे NH-16 च्या धनकुनी-खड़गपूर विभागावर स्थित आहे, जे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर चालते आणि प्रमुख शहरांना जोडणाऱ्या सुवर्ण चतुर्भुज प्रकल्पाचा भाग आहे. 

त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेशातील बराझोर टोल प्लाझा हा गेल्या पाच वर्षांत 1,480.75 कोटी रुपयांच्या संकलनासह चौथ्या क्रमांकाचा टोल कलेक्शन प्लाझा आहे. बराझोर हे NH-19 च्या इटावा-चकेरी (कानपूर) विभागावर स्थित आहे, जो ग्रँड ट्रंक रोडचा देखील एक प्रमुख भाग आहे. घरौंडा टोल प्लाझा, NH-44 च्या पानिपत-जालंधरपर्यंत आहे.

श्रीनगर ते कन्याकुमारी हा भारतातील सर्वात लांब महामार्ग, एकूण कमाईच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या पाच वर्षांत 1,314.37 कोटी रुपयांचा टोल वसूल केला. हा टोल प्लाझाही कमाईत कमी नाही

टॉप-10 यादीतील इतर टोल प्लाझामध्ये गुजरातमधील NH-48 च्या भरूच-सुरत सेक्शनवरील चोर्यासी. राजस्थानमधील NH-48 च्या जयपूर-किशनगड सेक्शनवरील ठिकरिया/जयपूर प्लाझा. तामिळनाडूमधील NH-44 च्या कृष्णागिरी-थुंबीपाडी सेक्शनवरील L&T कृष्णगिरी थोपूर, नवाबगंज हे उत्तर प्रदेशातील NH-25 च्या कानपूर-अयोध्या विभागावर आहे आणि सासाराम हे बिहारमधील NH-2 च्या वाराणसी-औरंगाबाद विभागात आहे. एकूणच, टॉप-10 यादीमध्ये गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी दोन प्लाझा आणि हरियाणा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि बिहारमधील प्रत्येकी एक प्लाझा समाविष्ट आहे.

1,063 टोलमधून 1.93 लाख कोटी रुपयांची कमाई

एकूणच, या 10 टोल प्लाझांनी गेल्या पाच वर्षांत 13,988.51 कोटी रुपयांचा टोल वसूल केला आहे. जो देशभरातील टोलनाक्यांवरील एकूण टोल संकलनाच्या 7 टक्क्यांहून अधिक आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2019-20 ते 2023-24 दरम्यान सर्व टोल प्लाझांकडून एकूण 1.93 लाख कोटी रुपये वापरकर्ता शुल्क किंवा टोल म्हणून गोळा करण्यात आले, 2023-24 मध्ये सर्वाधिक 55,882 कोटी रुपये जमा झाले. या कालावधीत प्रत्येक टोल प्लाझाची सरासरी वसुली 190 कोटी रुपये होती, तर या टॉप-10 टोल प्लाझाचे सरासरी संकलन सुमारे 1,400 कोटी रुपये होते. सध्या देशभरात एकूण 1,063 वापरकर्ता शुल्क प्लाझा किंवा टोल प्लाझा आहेत, त्यापैकी गेल्या पाच वर्षांत एकूण 457 टोल प्लाझा बांधण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Pune News: खेड शिवापूर टोल नाक्यावर मोठी कारवाई; एक कोटीपेक्षा जास्तीचा अवैध गुटखा ट्रक सह जप्त, ट्रकसह 2 जण ताब्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde And Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आमनेसामने; नेमकं काय घडलं?Shivsainik Bail granted On Kunal Kamraकुणाल कामराच्या सेटची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूरYogesh Kadam On Kunal Kamra CDR : कुणाल कामराला कुणी पैसे दिलेत का? हे तपासणार : योगेश कदम100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
Embed widget