एक्स्प्लोर

Ambadas Danve : अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

Ambadas Danve : मुंबई पोलिसांतील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केलाय.

Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी विधान परिषदेत (Vidhan Parishad) पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकलाय. मुंबई पोलिसांतील (Mumbai Police) मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा आरोप त्यांनी विधान परिषदेत केलाय. अंबादास दानवे यांनी सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांना पेन ड्राईव्ह दिलाय. त्यात पाकिस्तानी लोकांसोबतचे संभाषण असून मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची त्यांना मदत होते, याबाबतची माहिती दिली आहे. अंबादास दानवे यांच्या गंभीर आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे.    

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतमुंबई पोलिसांतील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा आरोप केलाय. बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लोटस 24 नावाच्या ऍपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएलसाठी आल्याची माहिती अंबादास दानवे यांनी सभागृहाला दिली आहे.   

नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे? 

अंबादास दानवे म्हणाले की, माझ्याकडे एक पेन ड्राईव्ह आहे. तो मी सभापती महोदय आपल्याला देत आहे. एक क्रिकेट बॅटिंग लोटस 24 नावाचे ॲप आहे. यात मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन हे सातत्याने बेटिंग करतात. पाकिस्तानमधील खेळाडूंशी या लोकांचे संपर्क आहेत. मुंबई पोलिसांसोबत यांच्या खुलेआम बैठक होतात. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लोटस 24 नावाच्या ऍपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएलसाठी आल्या आहेत. या राज्यात खुलेआम पोलिसांच्या सहकार्याने अशा घटना आहेत, असा गंभीर आरोप करत अंबादास दानवे यांनी  सभापती राम शिंदे यांना दिलेल्या पेन ड्राईव्हमध्ये पाकिस्तानी लोकांसोबतचे संभाषण असून यामध्ये कशाप्रकारे मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची मदत होते? याबाबत माहिती सभागृहात दिली आहे. 

टपरीवाल्यांवर काय कारवाई करता? पोलिसांवर करा

दरम्यान, अंबादास दानवे यांनी राज्यात गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा येतो, असा आरोप देखील केलाय. त्यांनी म्हटलंय की, आष्टी येथे 18 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. जळगाव जामोद येथे 25 लाखांचा गुटखा जप्त, गडचिरोलीला दहा लाखाचा गुटखा टपरीवाल्यांकडून जप्त केला. गुजरातमधून खुलेआम पोलिसांच्या संरक्षणात राज्यात गुटखा येत आहे. तुम्ही या टपरीवाल्यांवर काय कारवाई करता? पालघरमधून खुलेआम तिथले पोलीस अधिकारी आणि परिवहन विभागाचे अधिकारी मदत करता आणि तुम्ही आष्टीला दोन लाखाची कारवाई करता, गडचिरोलीला आठ लाखाची कारवाई करता. यात जर कारवाई करायची असेल तर पालघरचे पोलीस अधिकारी आणि परिवहन अधिकारी यांच्यावर कारवाई करा, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Sanjay Raut: आधी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतली, मग म्हणाले बहुमत चंचल असतं, कधीही.... संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्या

उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती; प्रत्यक्षात एका खासदाराशीच झालं बोलणं
उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती; प्रत्यक्षात एका खासदाराशीच झालं बोलणं
EVM मधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप
EVM मधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप
रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
BJP : सांगली सातारा विधानपरिषदेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन, सांगली महापालिकेचे नगरसेवक अज्ञातस्थळी, एसी बसमधून सहलीला रवाना
सांगली सातारा विधानपरिषदेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन, सांगली महापालिकेचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
Embed widget