एक्स्प्लोर

Post Office Kisan Vikas Patra Scheme : पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! काही दिवसात पैसे दुप्पट, 5 लाख रुपये जमा करून 10 लाख रुपये मिळवा, 1000 रुपयांपासून गुंतवणूक

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजना खूप लोकप्रिय योजना आहे. यामध्ये गुंतवलेली रक्कम दुप्पट होते. विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचाही लाभ मिळतो.

Post Office Kisan Vikas Patra Scheme : पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या लहान-मोठ्या बचत योजना (Investment Plan) चालवल्या जातात, ज्या त्यांच्या गुंतवणूकदारांमध्ये मोठा फायदा होतो. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना (Investment Scheme) लोकप्रिय आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना भरघोस परताना मिळतो. यातच किसान विकास पत्र योजनेचा समावेश होतो. या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दुप्पट करण्याची हमी दिली जाते. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही किसान विकास पत्र योजनेचा उत्तम पर्याय निवडू शकता. या योजनेवर सरकार 7 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे.

सुरक्षित गुंतवणुकीसह उत्तम परतावा

प्रत्येकाला आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवून सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याची इच्छा असते. गुंतवणूक सुरक्षित असावी आणि त्यातून चांगला परतावा मिळावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांकडे गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजना अंतर्गत सरकार 7.5 टक्के व्याज देत आहे. तुम्ही या योजनेत 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

तुम्ही 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकता

किसान विकास पत्र योजनेत तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही, म्हणजेच तुम्ही तुम्हाला पाहिजे तितकी गुंतवणूक करू शकता आणि फायदा मिळवू शकता. 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू केल्यानंतर तुम्ही 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे या योजनेत तुम्ही संयुक्त खाते उघडूनही गुंतवणूक करू शकता. यासोबतच किसान विकास पत्रामध्ये नॉमिनीची सुविधाही उपलब्ध आहे. यामध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुलेदेखील त्यांच्या स्वतःच्या नावाने KVP खाते उघडू शकतात.

115 महिन्यांत पैसे दुप्पट 

किसान विकास पत्र योजनेअंतर्गत तुमचे पैसे दुप्पट करण्याचं समीकरण कसं आहे जाणून घ्या. यासाठी तुम्हाला 9 वर्षे आणि 7 महिन्यांसाठी गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच, जर तुम्ही किसान विकास पत्र योजनेत 115 महिन्यांसाठी 1 लाख रुपये गुंतवले तर या कालावधीत ही रक्कम 2 लाख रुपये होईल. जर तुम्ही यामध्ये 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेल्या रकमेवर व्याज चक्रवाढ आधारावर मोजले जाते, म्हणजे तुम्हाला व्याजावरही व्याज मिळते.

यापूर्वी, या योजनेअंतर्गत, पैसे दुप्पट होण्यासाठी 123 महिने लागायचे, आता सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2023 मध्ये याचा कालावधी कमी करून 120 महिने केला आणि काही महिन्यांनंतर, अधिक लाभ देण्यासाठी सरकारने हा कालावधी 115 महिने केला आहे.

KVP खाते कसे उघडावे?

किसान विकास पत्र योजनेसाठी खाते उघडणे खूप सोपे आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जमा पावतीसह अर्ज भरावा लागेल आणि त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टमध्ये जमा करावी लागेल. अर्जासोबत तुम्हाला तुमचे ओळखपत्रही जोडावे लागेल. किसान विकास पत्र ही एक छोटी बचत योजना आहे. दर तीन महिन्यांनी सरकार आपल्या व्याजदराचा आढावा घेते आणि आवश्यकतेनुसार बदल करते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Post Office : महिलांसाठी दोन भन्नाट योजना! पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करून लाखोंचा परतावा मिळवण्याची संधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Journalism Awards Mandar Gonjari:प्रतिनिधी मंदार गोंजारींना रामनाथ गोएंका एक्सलन्स जर्नलीझम पुरस्कारABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 March 2025Gadchiroli Honey Bee : मधमाशांशी फ्रेंडशिप, घरात 8-10 पोळं, मधमाशांसोबत राहणारं कुटुंबNagpur Rada Update : दंगलीत सहभागी होण्यासाठीच आले होते 'ते' 24 आरोपी दंगलग्रस्त भागातले नाहीच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
Embed widget