7 रुपयांचा शेअर 1800 रुपयांवर, 1 लाख रुपये असणाऱ्यांचे झाले 2 कोटी 33 लाख, गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर कोणता?
Stock Market : आज एका शेअरने गुंतवणुकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. 7 रुपयांचा शेअर 1800 रुपयांवर पोहोचला आहे.
Stock Market : स्टॉक मार्केटमध्ये (Stock Market) जुन्या गुंतवणूकदारांच्या (Invester) पोर्टफोलिओमध्ये असे स्टॉक असतात, ज्याला ते त्यांचे मल्टीबॅगर रिटर्न स्टॉक म्हणतात. मार्केटमधील प्रत्येक गुंतवणूकदार मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असतो. जेणेकरुन त्यांना उत्कृष्ट परतावा मिळेल. आज आपण एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल माहिती पाहणार आहोत. या स्टॉकने उत्कृष्ट परतावा दिला आहे. आज BSE वर कंपनीचे शेअर्स 2.54 टक्क्यांच्या वाढीसह Rs 1,830.00 वर बंद झाले आहेत. 7 रुपयांचा शेअर 1800 रुपयांवर पोहोचला आहे.
बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन
बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन असे या स्टॉकचे नाव आहे. या शेअरने 22 वर्षांत गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. 22 वर्षांपूर्वी 2003 मध्ये बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 7.60 रुपये होती, परंतु आज या शेअरची किंमत बीएसईवर 1,832.30 रुपये आहे. या कालावधीत या शेअरने 23218 रुपयांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्याने 22 वर्षांपूर्वी शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि अद्याप शेअर्स विकले नसतील, तर त्या गुंतवणूकदाराला 2.33 कोटी रुपये झाले असतील.
कंपनीने जाहीर केला लाभांश
बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांशाच्या रुपात भेट दिली आहे. शुक्रवार, 21 मार्च रोजी झालेल्या बैठकीत, 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 2 रुपये दर्शनी मूल्यासह 4 रुपये प्रति इक्विटी शेअरचा दुसरा अंतरिम लाभांश मंजूर केला आहे. यासाठी 27 मार्च ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत ज्या शेअरधारकांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजच्या नोंदींमध्ये शेअर्सचे फायदेशीर मालक म्हणून दिसतात ते लाभांश प्राप्त करण्यास पात्र असतील.
5 वर्षात शेअर्समध्ये 201.21 टक्के वाढ
कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 0.94 टक्क्यांनी वाढ झाली असून एका वर्षात 16.60 टक्क्यांची वाढ झाली आहे. एवढेच नाही तर कंपनीच्या शेअर्समध्ये 2 वर्षात 120.26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 5 वर्षात 201.21 टक्के वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये चढ उतार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं. शेअर मार्केटच्या माध्यमातून कमी काळात अधिक नफा मिळवता येतो, त्यामुळं अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कराताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Multibagger Stock : 1 रुपयाचा 'हा' शेअर 400 पार गेला, पाच वर्षात 23494 टक्के परतावा, 50 हजारांचे बनले 1 कोटी रुपये
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
