Amy Jackson Welcome Baby Boy: सात महिन्यांपूर्वी लग्न, आता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं दिला गोंडस बाळाला जन्म; पहिली झलक दाखवून नावही सांगितलं
Amy Jackson Welcome Baby Boy: सात महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधलेल्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तसेच, तिनं आपल्या बाळाचं नावंही चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

Amy Jackson Welcome Baby Boy: ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडेल एमी जॅक्सन (Amy Jackson) दुसऱ्यांदा आई झाली आहे. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त दक्षिण चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या एमीनं सोशल मीडियावर तिच्या मुलाची पहिली झलक दाखवली आहे. त्याचं नावही उघड झालं आहे. एमीला तिच्या पहिल्या जोडीदारापासून एक मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.
एमी जॅक्सननं तिचा पार्टनर एड वेस्टविकसोबतचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या मांडीवर तिचं बाळही दिसतंय. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "जगात तुझं स्वागत आहे, बेबी बॉय" त्यासोबतच एमीनं आपल्या बाळाचं नावही रिवील केलं आहे, "ऑस्कर अलेक्जेंडर वेस्टविक".
एमी जॅक्सनवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
एमीच्या पोस्टवर अभिनंदन करणाऱ्या लोकांचा ओघ सुरू झाला आहे. अदा खानपासून ते बंदगी कालरापर्यंत सर्वांनी एमीला शुभेच्छा दिल्या आहेत. चाहतेही एमी जॅक्सनच्या पोस्टवर खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
एमी जॅक्सननं शेअर केली बेबी बॉयची झलक
एड वेस्टविकनं 24 मार्च रोजी संध्याकाळी इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर पोस्ट शेअर केली. एड वेस्टविक आणि एमी जॅक्सनच्या आयुष्यात एका लहान मुलीचं स्वागत केलं. एड वेस्टविकनं आपलं न्यू बॉर्न बेबी आणि मॉमी एमीसोबत काही गोड फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये एमीनं आपल्या न्यू बॉर्न बेबीला कुशीत घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि एड वेस्टविक आपल्या लेडी लव्हच्या गालावर किस करताना दिसत आहे.
मुलाचं नाव ऑस्कर
एका फोटोमध्ये एमी जॅक्सन आपल्या न्यू बॉर्न बेबीचा हात पकडून दिसतोय. एका फोटोमध्ये त्यानं आपल्या बाळाला कुशीत घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोजमध्ये एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
एमी जॅक्सन आपल्या लहान मुलाचं नाव ऑस्कर (Oscar) ठेवलं आहे. फोटो शेअर करत एड वेस्टविकनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "जगात तुझं स्वागत आहे बेबी बॉय, ऑस्कर एलेक्जेंडर वेस्टविक" एड वेस्टविकनं पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांकडून न्यू मॉम-डॅडवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.























