एक्स्प्लोर

बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!

Pakistan News : गगनाला भिडणारी महागाई आणि कर्जाच्या संकटानं पाकिस्तान दबला गेला आहे. चीनसारख्या मित्र देशानं मदत करुनही पाकिस्तानच्या समस्या काही कमी होण्याचं नाव घेईनात.

Pakistan Oil And Gas Reserve Discovery: नवी दिल्ली : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला (Pakistan News) नुकताच एक खजाना सापडला आहे. पाकिस्ताननं आपल्या सागरी हद्दीत (Maritime Boundary) कच्च्या तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड मोठे साठे शोधून काढले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे नशीब बदलणार असल्याचं बोललं जात आहे. तीन वर्षांच्या सर्वेक्षणानंतर सापडलेल्या साठ्याचं वर्णन जगातील चौथ्या क्रमांकाचं तेल आणि वायू क्षेत्र म्हणून केलं जात आहे. कच्च्या तेलाला 'काळं सोनं' असंही म्हणतात.

गगनाला भिडणारी महागाई आणि कर्जाच्या संकटानं पाकिस्तान दबला गेला आहे. चीनसारख्या मित्र देशानं मदत करुनही पाकिस्तानच्या समस्या काही कमी होण्याचं नाव घेईनात. आर्थिक संकटादरम्यान, राजकीय अस्थिरता ही देखील मोठी समस्या आहे. सर्व बाजूंनी समस्यांनी घेरलेल्या पाकिस्तानला दररोज दहशतवादाचा सामना करावा लागत आहे.

'काळं सोनं' पाकिस्तानचं नशीब बदलणार? 

पाकिस्तानला समुद्राच्या तळाशी एक आशेचा किरण दिसला आहे, जो भविष्यात आर्थिक संकट दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. दरम्यान, पाकिस्तानच्या तेल आणि वायू नियामकाच्या एका माजी सदस्यानं डॉन न्यूज टीव्हीशी बोलताना सांगितलं की, पाकिस्ताननं नव्या शोधांबद्दल आशावादी असलं पाहिजे, परंतु असं कधीच होत नाही की, अपेक्षेप्रमाणे तेल आणि नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे.

देशाच्या उर्जेच्या गरजा नव्या साठ्यांद्वारे भागवल्या जातील का? असं विचारलं असता, ते म्हणाले की, ते तेल आणि नैसर्गिक वायू साठ्याच्या आकारावर आणि नंतर त्याच्या पुनर्प्राप्ती दरावर अवलंबून असेल. पुढे बोलताना ते म्हणाले की, "हा नैसर्गिक वायू रिझर्व्ह झाला तर, आम्ही आयात करतो, तो नैसर्गिक वायू खरेदी करणं बंद करू आणि जर हे तेल राखीव असेल, तर आयात केलेल्या तेलाऐवजी आम्ही ते वापरू.

ऊर्जेचे स्त्रोत आयात करतो पाकिस्तान 

पाकिस्तान आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे. 2023 मध्ये पाकिस्ताननं 17.5 अब्ज डॉलर्सची ऊर्जा आयात केली होती. पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या अहवालानुसार, येत्या 7 वर्षांत पाकिस्तानचं ऊर्जा आयात बिल दुप्पट होऊन 31 डॉलर्स अब्ज होईल. पाकिस्तान आपल्या गरजेच्या 29 टक्के गॅस, 85 टक्के कच्चं तेल, 20 टक्के कोळसा आणि 50 टक्के LPG आयात करतो.

पाकिस्तानला तात्काळ दिलासा नाही

नवे साठे सापडल्यानं पाकिस्तानमध्ये उत्साहाचं वातावरण असलं, तरीदेखील पुढचा मार्ग तितका सोपा नाही. पाकिस्तानचे हे स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होणार नाही, असं पाकिस्तानच्या तेल आणि वायू नियामकाचे माजी सदस्य म्हणाले आहेत. ते म्हणाले की, राखीव साठा सापडला आहे, परंतु ते खोदून नंतर तेल किंवा वायू काढणं आणि त्यातून महसूल मिळवणं ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि लांबलचक आहे. त्यामुळे साठे सापडूनही पाकिस्तानला त्याचा लाभ मिळवण्यासाठी आणखी खूप दिवस लागणार, यात काही शंका नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणारPune Ajit Pawar Vadapav : बाप्पांच्या विसर्जनात Ajit Pawar यांनी घेतला वडापावचा आस्वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget