एक्स्प्लोर

Gold Rate : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?

Gold Rate : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. तर, चांदीची चमक काहीशी ओसरल्याचं दिसून आलं.

Gold Rate Today नवी दिल्ली: नववर्षाच्या पहिल्या दिवशी सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. तर, चांदीच्या दरामध्ये घसरण झाल्याचं देखील दिसून आलं. 24 कॅरेट सोन्याच्या दरात सरासरी 372 रुपयांनी वाढ झाली.  10 ग्रॅम सोन्याचे दर 76534 रुपयांवर पोहोचले. चांदीच्या दरात मात्र 117 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. चांदीचा एक किलोचा दर 85900 रुपये पाहायला मिळाला. हे दर आयबीएकडून जारी करण्यात आलेले असून हे दर जीएसटीशिवायचे आहेत. तुमच्या शहरांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात 1000 ते 2000 रुपयांचं अतंर पाहायला मिळू शकतं. 

23 कॅरेट सोन्याचा दर आज 371 रुपयांनी महागला असून 10 ग्रॅमसाठी 76228 रुपये मोजावे लागतील.  22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 341 रुपयांची वाढ झाली. याचा 10 ग्रॅमचा दर 70105 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात देखील279 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅमचा दर 57401 रुपये इतका आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर 217 रुपयांनी वाढून  44772 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 

 सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? 

सोनं खरेदी करण्यापूर्वी किंमतीची पडताळणी करुन घेणं आवश्यक आहे. ज्या दिवशी तुम्हाला सोने खरेदी करायची आहे तेव्हा तुम्ही इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटला भेट देऊन दर पाहू शकता. सोन्याचे 24 कॅरेट,22 कॅरेट,18 कॅरेटचे दर वेगवेगळे असतात. 

 सोन्याच्या दागिण्यांची खरेदी करताना वजनाची अचूक पडताळणी करणं आवश्यक आहे. सोने खरेदी करताना वजनात फरक झाल्यास देखील मोठं नुकसान होऊ शकतं. हॉलमार्कवालं सोनं खरेदी करताना बिलाची मूळ प्रत घेणं आवश्यक आहे. त्यावर प्रत्येक गोष्टींची नोंद असणं आवश्यक आहे.  दागिन्यांची खरेदी करताना ज्वेलर्सकडून मेकिंग चार्जेस आकारले जातात. यामध्ये थोडीशी सवलत मिळू शकते. 

एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 147 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. एमसीक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 76894 रुपये होता चांदीच्या दरात एमसीक्सवर 147 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. तिथं एक किलो चांदीचा दर 87380 रुपये होता. 

नवी दिल्ली, चंदीगड, जयपूर, लखनौ या शहरांमध्ये सोन्याच्या दरात 440 रुपयांची वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 78150 रुपये आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु,हैदराबाद,  नागपूर या शहरात देखील सोनं  440 रुपयांनी वाढलं असून 10 ग्रॅमचा दर 78000 रुपये आहे. तर, अहमदाबाद आणि पाटणा येथे सोन्याच्या दरात 440 रुपयांची वाढ झाली. इथं 10 ग्रॅम सोन्याचा दर 78050 रुपये आहे.

इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News : 30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
CIA JFK assassination: अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
Aurangzeb Nagpur: औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
Sikandar Release Date: सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 20 March 2025Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नव्यानं NIA मार्फत चौकशी करण्याची मागणीABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 20 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News : 30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
CIA JFK assassination: अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
Aurangzeb Nagpur: औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
Sikandar Release Date: सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
Astrology : आज नीचभंग योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मीची राहील कृपा, धन-संपत्तीत होईल भरभराट
आज नीचभंग योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मीची राहील कृपा, धन-संपत्तीत होईल भरभराट
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
Embed widget