Astrology : आज नीचभंग योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मीची राहील कृपा, धन-संपत्तीत होईल भरभराट
Astrology Panchnag Yog 20 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ कोणत्या राशींना मिळणार आहे ते जाणून घेऊयात.

Astrology Panchnag Yog 20 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 20 मार्चचा दिवस म्हणजेच गुरुवारचा दिवस आहे. आजचा दिवस दत्तगुरुंना समर्पित आहे. आज गुरु ग्रहाचं वृषभ राशीत आणि शुक्राचं संक्रमण मीन राशीत झाल्याने राशी परिवर्तन योग (Yog) जुळून आलाआहे. तसेच, आज नीचभंग राजयोग देखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस सर्व राशींसाठी खास असणार आहे. यापैकी 5 राशींना (Zodiac Signs) चांगला लाभ मिळणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ कोणत्या राशींना मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
आजच्या दिवशी तुमच्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तसेच, तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, पैसे गुंतवणुकीसाठी तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कुटुंबात वडिलांकडून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
आर्थिक दृष्टीकोनातून पाहिल्यास कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज तुमच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असेल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे. आज तुमचं महत्त्वाचं काम पूर्ण झाल्याने तुमचं मन प्रसन्न राहील. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी काही जबाबदाऱ्या तुमच्यावर पडतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज राजकीय क्षेत्रात तुमचा सन्मान वाढलेला दिसेल. तसेच,सामाजिक कार्यात देखील तुम्ही सहभागी व्हाल. तुमच्या व्यवसायातील अनेक अडथळे दूर होतील. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. तसेच, तुमचं आरोग्यदेखील चांगलं राहील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान वाढेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, तुमच्या व्यवसायात जे उतार-चढाव होते ते हळुहळू दूर होतील. आज तुम्हाला अचानक धनलाभ होईल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात ज्या अडचणी निर्माण होत होत्या त्या हळुहळू दूर होतील. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तुम्हाला विविध क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तुमची अनेक रखडलेली कामे लवकर पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope Today 20 March 2025 : आजचा गुरुवार 3 राशींसाठी ठरणार खास; उत्पन्नाचे स्त्रोत होणार खुले, 12 राशींसाठी दिवस कसा जाईल? वाचा आजचे राशीभविष्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

