(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Price Today : सोन्याला झळाळी! सोन्याच्या दरानं गाठली विक्रमी पातळी; आज सोने-चांदीचा दर काय?
Gold Rate Today : जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडींचा सोने-चांदीच्या दरावर परिणाम होत आहे.
Gold Price Today, 5 December 2023 : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. आज मात्र सोने-चांदीच्या दरवाढीतून काहीसा दिलासा मिळाला आहे. आज सोने आणि चांदीच्या दरा कोणतीही वाढ झालेली नाही. आज 5 डिसेंबरला सोने-चांदीचा दर स्थिर आहे. मुंबईत आज सोन्याचा भाव (Gold Rate Today) 22 कॅरेट सोन्यासाठी 5,885 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 6,420 रुपये प्रति ग्रॅम आहे.
आज जळगाव सुवर्ण नगरीमध्ये सोन्याचे दर 63100 आणि जीएसटीसह 6500 रुपये प्रति तोळा शुद्ध सोन्याचे दर आहेत. सोमवारपेक्षा 1200 रुपयांची घसरण झाली आहे. मुंबईत सोन्याचा दर 64 हजारांच्या पुढे आहे. जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडीचा हा परिणाम मानला जात आहे.
लग्नसराईत सोने-चांदी दरवाढीतून दिलासा
ऐन लग्नसराईत सोन्याच्या दर वाढीतून दिलासा मिळाला आहे. आज सोन्याची किंमत स्थिर आहे, सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गुडरिटर्न्स (Goodreturns) वेबसाईटनुसार, आज 5 डिसेंबरला 18 कॅरेट सोन्याचा दर 48,150 रुपये प्रतितोळा आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 58,850 रुपये आहे. तर आज 24 कॅरेट सोन्याचा दर 64,200 रुपये प्रति तोळा आहे.
एक किलो चांदीचा दर काय?
आज सोन्याप्रमाणे चांदीचा दरही स्थिर (Silver Rate Today) असून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. आज सोमवारी एक किलो चांदीचा दर 80,500 रुपये आहे. गेल्या काही दिवसांत चांदीच्या दरात वाढ झाली होती, आज मात्र यात काहीसा दिलासा मिळाला आहे.
देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)
- मुंबई - मुंबईत सोन्याचा दर स्थिर असून 64,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)
- दिल्ली - दिल्लीतही सोन्याचा दर आज कायम आहे. दिल्लीत सोनं 64350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. (Delhi Gold Rate Today)
- कोलकाता - कोलकातामध्ये सोन्याचा भाव 380 रुपयांनी वाढला आहे. कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 64200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
- चेन्नई - चेन्नईत आज सोन्याचा दर 65180 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)
महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)
- पुणे - 64200 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)
- नाशिक - 24 कॅरेट सोने 64230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)
- नागपूर - 24 कॅरेट सोने 64200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)
- कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 64200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)
लग्नसराईत सोने खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
सोने खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला फसवणुकीपासून वाचवू शकता. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर सर्व प्रथम त्या दागिन्यांवर सहा क्रमांकाचा हॉलमार्क आहे का ते तपासा. नियमानुसार कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाही.