एक्स्प्लोर
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात तेजी, चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? मुंबईसह विविध शहरातील सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Silver Rate: सोने आणि चांदीच्या दरावर जागतिक स्थितीचा परिणाम दिसून येत आहे. सोने दरावर डॉलर्सची मजबुती, महागलेलं कच्चं तेल यासारखे फॅक्टर्स परिणाम कारक ठरत आहे.

सोने दरात वाढ
1/5

सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळाली आहे. कमोडिटी बाजार ते सराफ बाजारात सोन्याच्या दरात तेजी आहे. सोन्याच्या दरावर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम होतोय. डॉलर्सचा दर जसा वाढतोय तसा सोन्याचा दर वाढू लागतोय.
2/5

सोने आणि चांदीच्या दरात तेजीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली तर चांदीच्या दरात घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 78270 रुपये आहे. एमसीक्सवर सोन्याचे दर 114 रुपयांनी वाढले दिसतात.
3/5

सोन्याचा मंगळवारचा 10 ग्रॅमचा दर 78156 रुपये इतका होता. आज बाजार सुरु झाला तेव्हा 10 ग्रॅम सोन्याचा दर 78241 ते 78381 रुपयांच्या दरम्यान होता. प्रत्यक्ष बाजारातील सोन्याच्या किमती वेगळ्या असतील.
4/5

चांदीच्या दरात किरकोळ घसरण पाहायला मिळत आहे. एक किलो चांदीचा दर 90520 रुपये इतका आहे. कालच्या तुलनेत चांदीच्या दरात 36 रुपयांची घसरण झाली. काल चांदीचा दर 90860 रुपयांपर्यंत गेला होता.
5/5

दिल्ली, चंदीगढ, जयपूर, लखनौमध्ये सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोन्याच्या दर 80220 रुपये इतका आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद आणि नागूपरमध्ये सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली, इथं 24 कॅरेट 10 ग्रॅमचा दर 80070 रुपये आहे. अहमदाबाद,पाटणा येथे देखील सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली असून सोन्याचा दर 80120 रुपयांवर आहे.
Published at : 15 Jan 2025 01:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धुळे
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
