एक्स्प्लोर
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
Jio Financial and Zomato Nifty Update: जियो फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड आणि झोमॅटो नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी 50 मध्ये येऊ शकतात.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड
1/5

रिलायन्स इंडस्ट्रीजची फिनटेक क्षेत्रातील कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि झोमॅटो नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी 50 मध्ये एंट्री करु शकतात. जेएम फायनान्शिअलच्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
2/5

निफ्टी 50 रिबॅलन्सिंग फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे. यामध्ये निश्चित केलं जाईल की कोणत्या नव्या स्टॉक्सना निफ्टी 50 मध्ये घ्यायचं, कोणत्या स्टॉक्सला बाहेर काढायचं. मात्र याची अंमलबजावणी 31 मार्च 2025 पासून होईल.
3/5

जेएम फायनान्शिअलच्या रिपोर्टनुसार झोमॅटो आणि जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस निफ्टी 50 मध्ये आल्यास भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडची जागा घेतील.
4/5

जेएम फायनान्शिअलपूर्वी नुवामा अल्टरनेटिव्ह आणि क्वांटिटेटिव रिसर्चनं देखील यापूर्वी झोमॅटो निफ्टी 50 मध्ये येऊ शकतं असा अंदाज वर्तवला होता. नुवामानं ब्रिटानियाऐवजी आयशर मोटर्स बाहेर जाईल असा अंदाज वर्तवला होता. दोन्ही रिपोर्टसमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बाहेर जाऊ शकतं असा अंदाज वर्तवला आहे.
5/5

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर सध्या 273.30 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर, झोमॅटोचा शेअर 238 रुपयांवर ट्रेड करत आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 15 Jan 2025 09:43 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
