Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Team India Announced for Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळू शकलेले नाही. बुमराहलाही संघात स्थान मिळाले आहे.

Team India Announced for Champion Trophy 2025 : ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आज (18 जानेवारी) रोजी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्याच हातात असेल, या वेळी चॅम्पियन्स ट्रॉफी 'हायब्रीड मॉडेल' अंतर्गत पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 19 फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे. तर भारतीय संघ 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
गिलकडेही जबाबदारी, यशस्वी-शमीही संघात
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळू शकलेले नाही. दुखापतग्रस्त बुमराहलाही संघात स्थान मिळाले आहे. यशस्वी जैस्वाल प्रथमच एकदिवसीय संघाचा भाग आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे 14 महिन्यांनंतर वनडे संघात पुनरागमन झाले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
- टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंवर पुन्हा एकदा विश्वास
- चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड
- मोहम्मद सिराजला संघात संधी मिळाली नाही
- मोहम्मद शमी 14 महिन्यांनी संघात परतला
- शमी, बुमराह आणि अर्शदीप असे तीन वेगवान गोलंदाज
- कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर फिरकी सांभाळणार
- केएल राहुल बॅकअप विकेटकीपर, रिषभवर मानसिक दबाव असणार
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बी. मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 8 संघांमध्ये एकूण 15 सामने होणार
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 8 संघांमध्ये एकूण 15 सामने होणार आहेत. संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गट-अ मध्ये आहेत. त्यांच्यासह उर्वरित दोन संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. सर्व 8 संघ आपापल्या गटात 3-3 सामने खेळतील. यानंतर, प्रत्येक गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना दुबईत, तर दुसरा लाहोरमध्ये होणार आहे. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. अशा परिस्थितीत जर एखादा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तो स्पर्धेत एकूण 5 सामने खेळेल.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

