एक्स्प्लोर

Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार

Israeli attacks on Gaza : हा करार 3 टप्प्यात पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात हमास इस्रायलमधून अपहरण केलेल्या 33 ओलिसांची सुटका करणार आहे. तसेच, इस्रायली सैन्य गाझा सीमेपासून 700 मीटर मागे हटणार आहे.

Israeli attacks on Gaza : इस्रायलच्या कॅबिनेटने हमाससोबतच्या युद्धविराम म्हणजेच शस्त्रसंधी कराराला आज (18 जानेवारी) मंजुरी दिली. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, हा युद्धविराम रविवारपासून म्हणजेच उद्यापासून लागू होईल. इस्रायली मंत्र्यांनी कराराच्या बाजूने 24-8 मते दिली. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने शनिवारी सकाळी एक निवेदन जारी केले की सरकारने ओलीस परत करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. 7 ऑक्टोबर 2023 पासून गाझामध्ये इस्रायलच्या युद्धात किमान 46,788 पॅलेस्टिनी मारले गेले आणि 110,453 जखमी झाले आहेत. त्याच दिवशी हमासच्या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये किमान 1,139 लोक मारले गेले आणि 200 हून अधिक लोकांचे अपहरण करून ओलिस ठेवण्यात आले. यामध्ये काही ओलिसांचा मृत्यू झाला आहे. 

हमास इस्रायलमधून अपहरण केलेल्या 33 ओलिसांची सुटका करणार 

हा करार 3 टप्प्यात पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात हमास इस्रायलमधून अपहरण केलेल्या 33 ओलिसांची सुटका करणार आहे. तसेच, इस्रायली सैन्य गाझा सीमेपासून 700 मीटर मागे हटणार आहे. इस्रायलमधील न्याय मंत्रालयाने 95 पॅलेस्टिनी कैद्यांची यादीही जारी केली असून त्यांना रविवारी सोडण्यात येणार आहे. यामध्ये 69 महिला, 16 पुरुष आणि 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. इस्रायल 700 हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार आहे. त्यांच्या नावांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. या यादीत समाविष्ट असलेले अनेक लोक हत्येच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत, त्यात हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद सदस्यांचा समावेश आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलमध्ये घुसून 1200 लोकांची हत्या केली होती आणि 251 लोकांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर काही तासांनी इस्रायली सैन्याने गाझावर हल्ला केला.

युद्धविराम करार तीन टप्प्यात पूर्ण होईल

15 जानेवारी रोजी जो बिडेन म्हणाले की हा करार 19 जानेवारीपासून म्हणजे रविवारपासून तीन टप्प्यांत सुरू होईल. यामध्ये 42 दिवस ओलिसांची अदलाबदल केली जाईल.

पहिला टप्पा 

गाझामध्ये 19 जानेवारी ते 1 मार्चपर्यंत संपूर्ण युद्धविराम असेल. हमास 33 इस्रायली ओलीस सोडणार आहे. इस्रायल आपल्या ओलिसांपैकी एकाच्या बदल्यात दररोज 33 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल. प्रत्येक इस्रायली महिला सैनिकामागे 50 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाईल.

दुसरा टप्पा

पहिल्या टप्प्याच्या 16व्या दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारीपर्यंत सर्व काही सुरळीत राहिल्यास दुसऱ्या टप्प्याच्या योजनेवर चर्चा सुरू होईल. या काळात कोणताही हल्ला केला जाणार नाही. जिवंत राहिलेल्या ओलिसांची सुटका केली जाईल. इस्रायल 1,000 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल, ज्यात 15 वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा भोगत असलेल्या सुमारे 190 कैद्यांचा समावेश आहे.

तिसरा टप्पा

या कराराच्या शेवटच्या टप्प्यात गाझाचे पुनर्वसन केले जाईल. यासाठी 3 ते 5 वर्षे लागतील. हमासने मारलेल्या ओलीसांचे मृतदेहही इस्रायलकडे सोपवले जाणार आहेत.

नेतान्याहू यांच्या पक्षातील 2 मंत्र्यांनी युद्धबंदीला विरोध केला

पंतप्रधान नेतन्याहू यांचे लिकुड मंत्री डेव्हिड अमसालेम आणि अमिचाई चिकली हे आठ मंत्र्यांपैकी होते ज्यांनी युद्धबंदीच्या विरोधात मतदान केले. याशिवाय सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या ओत्झ्मा येहुदित पक्षाच्या 6 मंत्र्यांनीही युद्धबंदीच्या विरोधात मतदान केले. याआधी शुक्रवारी इस्रायलचे सुरक्षा मंत्री आणि उजव्या विचारसरणीचे नेते बेन-गवीर इटामार यांनी हमाससोबतच्या युद्धविराम कराराला विरोध केला होता.  करार मंजूर झाल्यास सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी त्यांनी दिली होती.

कतारमध्ये युद्धविरामासाठी वाटाघाटी

कतारची राजधानी दोहा येथे गेल्या अनेक आठवड्यांपासून युद्धविरामासाठी वाटाघाटी सुरू होत्या. या संभाषणात इजिप्त आणि अमेरिका देखील सामील होते. अल जझीराच्या वृत्तानुसार, कतारचे राजे शेख मोहम्मद यांनी बुधवारी हमास आणि इस्रायलच्या प्रतिनिधींची भेट घेतली, त्यानंतर हा करार पूर्ण झाला. ओलिसांच्या पहिल्या टप्प्याच्या सुटकेनंतर 15 दिवसांनी हमास उर्वरित ओलिसांची सुटका करेल. दरम्यान, दोन्ही बाजू कायमस्वरूपी युद्धबंदीबाबत बोलतील.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget