(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रिझर्व बँकेची सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद; गवर्नर शक्तिकांत दास कोणती घोषणा करणार?
देशभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशातच रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)चे गवर्नर शक्तिकांत दास आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)चे गवर्नर शक्तिकांत दास आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील उद्योगधंदे बंद आहेत. अशातच अनेक आर्थिक अडचणींना समोरं जावं लागत असून भविष्यातही आर्थिक मंदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या परिस्थितीशी सामना करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) काय घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्षं लागलं आहे.
दरम्यान, याआधी 27 मार्च रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)चे गवर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 0.75 टक्यांची घट झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे रेपो रेट 5.15 टक्यांवरून 4.40 टक्के करण्यात आलं आहे. रेपो रेट म्हणजे, रिझर्व बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) रेपो रेटच्या आधारे इतर बँकांना कर्ज देते.
शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर 5.15 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दरात 0.90 टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स रेपो दर 4.90 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकाता दास यांनी केली होती. याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही 0.90 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे.
याव्यतिरिक्त रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)ने सर्व बँकांना सल्ला दिला होता की, कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करा. रिझर्व बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या या अॅडव्हायझरीमुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | रेपो रेटमध्ये मोठी कपात, EMI तीन महिने स्थगित करण्याचा आरबीआयचा सल्ला
कर्जाच्या हफ्त्यांसाठीचा बँकांनी दिलेला दिलासा पडू शकतो 'महागात'!