एक्स्प्लोर
RBI Repo Rate Cut: रिझर्व्ह बँक पतधोरण जाहीर करणार, व्याज दरात कपातीच्या घोषणेकडे लक्ष, मध्यमवर्गाला दिलासा मिळणार?
RBI Repo Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज पतधोरण जाहीर करणार आहे. आरबीआयची 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पतधोरण विषयक बैठक सुरु आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतधोरण जाहीर करणार
1/5

केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला 12 लाख रुपयांपर्यंत प्राप्तिकरात करसवलत देण्यात आली आहे. नव्या कररचनेत बदल करण्यात आले. त्यामुळं मध्यमवर्गाला दिलासा मिळाला आहे.
2/5

रिझर्व्ह बँकेचे मुख्य गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पहिलं पतधोरण जाहीर करणार आहेत.
3/5

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं गेल्या सात पतधोरणांमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा मंदावलेला वेग साध्य करण्यासाठी केंद्रानं करसवलतीची रक्कम वाढवली आहे. आता आरबीआय रेपो रेट कपात करुन दिलासा देणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.
4/5

आरबीआयचे गव्हर्नर झाल्यानंतर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण विषयक समितीत मोठे बदल केले आहेत. सध्या पतधोरण समितीत 6 सदस्य आहेत.
5/5

सध्या रेपोरेट 6.50 इतका आहे. ब्लूमर्गच्या रिपोर्टनुसार संजीव मल्होत्रा हे महागाई नियंत्रण, आर्थिक वाढ याला प्राधान्य देऊ शकतात. गेल्या सात बैठकांमध्ये बदल झाला नसला तर या पतधोरण विषयक समितीत व्याज दर कपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. 25 बेसिस पॉईंट ची कपात करुन आरबीआयकडून रेपो रेट 6.25 केला जाऊ शकतो.
Published at : 07 Feb 2025 08:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion