(Source: Poll of Polls)
Narayan Rane Full Speech: नौदल दिनाचा कार्यक्रम, मालवणच्या किनारपट्टीवर नारायण राणेंचं हिंदीतून भाषण
Narayan Rane Full Speech: नौदल दिनाचा कार्यक्रम, मालवणच्या किनारपट्टीवर नारायण राणेंचं हिंदीतून भाषण
Indian Navy Day At Sindhudurg Fort : भारतीय नौदल दिनाच्या (Indian Navy Day) निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर कार्यक्रम होत असून त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहिले आहेत. या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर मालवणात युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिके करण्यात येणार आली. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यासह विधानसभा अध्यक्ष, स्थानिक खासदार, आमदार उपस्थित आहेत. दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.
ज्याचा दर्या त्याचे वैभव, ज्याचे आरमार त्याचा समुद्र या धोरणानुसार छत्रपती शिवाजी महाराजां आरमार उभं केलं आणि दर्यातील शत्रूंना धाकात ठेवलं. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी यंदाचा नौसेना दिन सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये साजरा करण्यात येत आहे. या पार्शवभूमीवर सागरी सुरक्षा वाढवण्यात आली असून सागरी पोलीस समुद्रात गस्त घालत आहेत.
भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या कार्यक्रमात सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास सांगितला. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधन केलं.