Sushma Andhare On Medha Kulkarni : 'मेधाताई बालिशपणा थांबवा जरा!'सुषमा अंधारे संतापल्या...
णे शहरातील सदाशिव पेठेमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग लावून चादर आणि फुलं चढवल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेची दखल भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली. ही घटना लक्षात येताच भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि काहींनी मिळून पुन्हा त्या हिरव्या रंगावरती भगवा रंग देऊन त्या ठिकाणी एक गणपतीचा फोटो ठेवला आहे. पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले असल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊ या कृती करूया, असं आवाहन भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे.
आपण जागरूक राहिलं पाहिजे
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी एबीपी माझाशी बोलताना नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. मेधा कुलकर्णी म्हणाल्या व्हाट्सअप वरती अनेक मेसेज येत राहिले. अनेकांकडून याबाबतची माहिती मिळाली. त्याचबरोबर त्याचे फोटो देखील पाठवण्यात आले होते. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो, फुलं होती, उदबत्ती लावल्या होत्या आणि हिरवा रंग लावला होता. त्या भिंतीवर ती आधीचा पिवळा रंग होता, जर भिंतीला रंगच द्यायचा होता तर पिवळा देता आला असता पण त्या कोपऱ्यावरती फक्त हिरवा रंग देण्यात आला होता. बऱ्याचदा अशा घटना कळतात, आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती देत असतो. अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत आणि जिथे घडत असतील तिथे आपण जागरूक राहिलं पाहिजे, असं आहे असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.