Lai Bhari Award 2024 : सुपर डुपर डान्स ते खतरनाक शायरी : लय भारी पुरस्कार 2024 : ABP Majha
Lai Bhari Award 2024 : सुपर डुपर डान्स ते खतरनाक शायरी : लय भारी पुरस्कार 2024 : ABP Majhamaha
New Year welcome : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरातील लोक सज्ज झाले आहेत. नव्या वर्षात नवे संकल्प घेऊन 2024 ला गुडबाय करत 2025 ला हॅलो करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईच्या जुहू चौपाटीवर दाखल झाले आहेत. या वर्षातील शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. , न्यूझीलंडमध्ये नवीन वर्ष सुरू झाले असून तिथं मोठ्या थाटामाटात जल्लोष होत आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी पर्यटकांची जुहू चौपाटीला पसंती
मुंबईकरांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी जुहू चौपाटीला मोठी पसंती दिली आहे.मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून मोठा संख्या मध्ये पर्यटक जुहू चौपाटीवर दाखल झाले आहेत. रात्री पर्यटकांची मोठी गर्दी असणार आहे. जुहू चौपाटीवर याच्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून जुहू चौपाटीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीमध्ये महिलांच्या सुरक्षेला कोणतीही बाधा होऊ नये यासाठी सिविल ड्रेसमध्ये मोठ्या संख्येनं महिला अधिकारी कर्मचारी गर्दीमध्ये फिरणार आहेत.