Eknath Shinde in Delhi : ऑपरेशन टायगरची चर्चा; एकनाथ शिंदे दिल्लीत, भाजप नेत्यांना भेटणार?
Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप (Maharashtra Politics) होऊ घातला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे सहा खासदार उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेला जाऊन मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाच्या हाती आहे. हे पक्षप्रवेश अगदी लवकरच होणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेनं ऑपरेशन टायगरची (Shivsena Opration Tiger) तयारी जवळपास पूर्ण झाल्याचं बोललं जात आहे.
उद्धव ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. सध्या ठाकरेंचे 9 खासदार लोकसभेत आहेत. त्यापैकी 6 खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात असं समजतंय. विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर ठाकरे गटात मोठी अस्वस्थता आहे. अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता लागली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडत हे सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं समजतंय. ठाकरेंचे नेमकी कोणते सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार त्यांच्या नावाची सध्या चर्चा रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या























