Murlidhar Mohol On Delhi Assembly Election : मागच्या 10 वर्षातील खोटं बोलणाऱ्या सरकारचा अंत : मोहोळ
Murlidhar Mohol On Delhi Assembly Election : मागच्या 10 वर्षातील खोटं बोलणाऱ्या सरकारचा अंत : मोहोळ
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मराठी नेतेही मैदानात उतरले होते..
Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि. 08) सकाळी आठ वाजेपासून सुरु झाली आहे. दिल्लीत एकूण 70 विधानसभेच्या जागा असून भाजपने (BJP) मोठी मुसंडी मारली आहे. भाजप 48 जागांवर आघाडीवर असून स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर आम आदमी पार्टीला दिल्लीत मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेस दिल्लीत एकाही जागेवर आघाडीवर नाही. आता यावरून माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.























