Chhagan Bhujbal : वेशांतर करून गेलो,धरपकड झाली; भुजबळांनी सांगितल्या सीमावादाच्या आठवणी
Chhagan Bhujbal : वेशांतर करून गेलो,धरपकड झाली; भुजबळांनी सांगितल्या सीमावादाच्या आठवणी
हे ही वाचा..
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. गेल्या काही काळात जयंत पाटील यांनी भाजपकडून पक्षात येण्याची ऑफर असल्याची चर्चा होती. जयंत पाटील यांचे भाषण सुरु असताना सत्ताधारी बाकावरुन त्यांना पुन्हा एकदा साद घालण्यात आली. यावेळी जयंत पाटील आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात झालेला संवाद सध्या राजकीय वर्तुळाचा चर्चेचा विषय ठरत आहे.
जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात विधानसभा सभागृहात फार गर्दी होते, अशी समस्या राहुल नार्वेकर यांच्यासमोर मांडली. त्यावेळी जयंत पाटील यांनी माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे उदाहरण दिले. ते असताना सभागृहात कशी शिस्त असायची, याबाबत जयंत पाटील सांगत होते. तेव्हा जयंत पाटील यांनी स्वत:चा उल्लेख आमदाराऐवजी अध्यक्ष असा केला. अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसलेल्या राहुल नार्वेकर यांनी ही चूक तात्काळ जयंत पाटील यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर जयंत पाटील यांनी म्हटले की, बघा राहुल नार्वेकरांचं माझ्याकडे किती बारीक लक्ष असते. यावर सभागृहात एकच हशा पिकला.