ठाकरे गटाच्या महिला नेत्यानं एकनाथ शिंदेंना डिवचलं, पुन्हा गायलं कुणाल कामराचं वादग्रस्त गाणं, भर रस्त्यात चोप देऊ, शिंदे गटाचा इशारा
सत्य हे कटू असतं. कुणाल कामरा यांच्या गाण्याने गद्दरांना मिरच्या झोंबल्याचे वक्तव्य शिवसेनाठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी केलं आहे.

बुलढाणा : स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने (Stand-up comedian Kunal Kamra) एका कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत विडंबनात्मक टिप्पणी केली आहे. यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली आहे. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अॅड. जयश्री शेळके (Advocate Jayashree Shelke) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्य हे कटू असतं. कुणाल कामरा यांच्या गाण्याने गद्दरांना मिरच्या झोंबल्याचे वक्तव्य जयश्री शेळके यांनी केलं आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी गायलं पुन्हा गायलं वादग्रस्त गाणं
कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता जे गाणं गायलं होतं तेच गाणं पुन्हा जयश्री शेळके यांनी गायलं आहे. या गाण्यामुळे सत्य बाहेर आल्यामुळं गद्दारांना मिरच्या झोंबल्याचे त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जयश्री शेळके यांच्याविरोधात बुलढाणा शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. बुलढाणा शिवसेना महिला आघाडीकडून जयश्री शेळके यांच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे. जयश्री शेळके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही केली आहे. यापुढे जर जयश्री शेळके यांनी अशा प्रकारची वक्तव्य केली तर त्यांना भर रस्त्यात चोप देण्यात येईल असा इशाराही बुलढाणा शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे देण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
कुणाल कामराने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने एक गाणं म्हटल्याचं दिसून येतंय. या गाण्यात त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना गद्दार म्हटलं आहे. घराणेशाही संपवण्यासाठी यांनी कुणाचातरी बाप चोरला असंही त्यामध्ये म्हटलं आहे. मंत्री नाही तर हे दलबदलू आहेत. मंत्रालयापेक्षा जास्त हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवरच जास्त असतात अशीही टीका त्यामध्ये करण्यात आली आहे. कुणाल कामराचं हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे. कामराचा हा व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून व्यंगात्मक टीका केल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते हे कुणाल कामराच्या विरोधात आक्रमक झाल्याचं दिसून आलं. अंधेरीचे आमदार मुरजी पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल केली आहे. कुणाल कामराचे हे गाणं एकनाथ शिंदे यांची बदनामी करणारं असल्याचं मत शिंदे गटाकडून व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे कुणाल कामराच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी असा एक मतप्रवाह आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बदनामीकारक गाणं असेल तर ते सहन करणार नाही असा इशारा शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. या आधीही कुणाल कामरा हा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पत्रकार अर्णब गोस्वामीला ट्रोल केल्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला होता. तसेच कुणाल कामराने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर त्याच्या कार्यक्रमातून टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
























