एक्स्प्लोर

प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?

कोल्हापूर पोलिसांनी चांगल्या पद्धतीनं टेक्निकल ईव्हीडन्स जमा करत प्रशांत कोरटकरला अटक केली, आता पुढची कायदेशीर कारवाई पोलीस करतील असे फडणवीस यांनी म्हटले.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या (Prashant koratkar) मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. तब्बल महिनाभरानंतर कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांनी संयुक्तिकपणे कारवाई करत प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक केली. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरुन धमकी देत शिवरायांबद्दल अवमानजनक शब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून कोल्हापूरला आणण्यात येत आहे. यापूर्वी प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण न्यायालयाने तो फेटाळला आहे. या अटकेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांना माहिती दिली. कोल्हापूर पोलिसांनी चांगल्या पद्धतीनं टेक्निकल ईव्हीडन्स जमा करत प्रशांत कोरटकरला अटक केली, आता पुढची कायदेशीर कारवाई पोलीस करतील असे फडणवीस यांनी म्हटले. 

कोल्हापूर पोलिसांनी चांगल्या पद्धतीनं टेक्निकल ईव्हीडन्स जमा करत प्रशांत कोरटकरला अटक केली, आता पुढची कायदेशीर कारवाई पोलीस करतील असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही हेच पोलिसांनी दाखवून दिलेलं आहे. बीएनएसअंतर्गत जी कारवाई असेल ती कारवाई आता त्यांच्यावर होईल, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले. 

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा 25 फेब्रुवारीपासून फरार होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. नागपुरातून फरार झालेला कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपून बसला होता, कोल्हापूर पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता. त्यानंतर, तो दुबईत पळून गेल्याचे वृत्तही माध्यमांत झळकले होते. मात्र, प्रशांत कोरटकरला आता एका महिन्यानंतर तेलंगणामधून अटक केली आहे. दरम्यान, इंद्रजीत सावंत यांनी कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. त्यामुळे कोरटकरला आता कोल्हापूरला आणण्यात येणार आहे. 

कोरटकरला मदत करणाऱ्यांची नाव निष्पन्न व्हावी

कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली असून कोल्हापूरच्या दिशेने त्यांना घेऊन येत आहेत, येथे येण्यासाठी त्यांना दहा ते बारा तास लागू शकतात. कोल्हापुरात आल्यानंतर कोरटकरची वैद्यकीय चाचणी करावी लागेल. वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करावा लागेल. कोरटकर काहीही खोटे आरोप करू शकतो. त्यामुळे, कोरटकरला लपण्यासाठी कोणी कोणी मदत केली हे सगळं समोर आलं पाहिजे. कोरटकर संदर्भात सह आरोपी कोण होऊ शकतात त्याचा सुद्धा तपास आवश्यक आहे. कोरटकरला अटक ठेवणे फार गरजेचे आहे, त्याला मदत करणाऱ्या लोकांची नावं निष्पन्न झाली पाहिजे, असे अॅड.असीम सरोदे यांनी म्हटलं. कोरटकरवर बेताल वक्तव्य करण्याचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे, इतर दोन असे एकूण तिन्ही गुन्हे कोल्हापूरला वर्ग करण्यात येतील. या तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. जर पोलिसांनी व्यवस्थित तपास केला, गुन्हा दाखल केल्यास कोरटरला शिक्षा होऊ शकते. कोरटकरला मदत करणारे त्याच्या जवळचे अधिकारी, सो कॉल्ड नातेवाईक अनेक आहेत, असेही सरोदे यांनी म्हटलंय

हेही वाचा

आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तटकरेंकडे नेमका कोणता जोदूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला
तटकरेंकडे नेमका कोणता जोदूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Shiv Sena Symbol Case : शिंदेंना अपात्र ठरवता येईल का? चिन्हाच्या वादावर काय परिणाम होईल? शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंना अपात्र ठरवता येईल का? चिन्हाच्या वादावर काय परिणाम होईल? शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Embed widget